असह्य शारीरिक त्रास होत असतांना ‘दुखण्याच्या माध्यमातून देवाने माझा अहं न्यून केला’, असा विचार करणार्‍या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची सकारात्मक वृत्ती !

सौ. चंद्ररेखा जाखोटिया

‘सनातनच्या सांगली येथील साधिका सौ. विद्या जाखोटिया या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांना ‘जीजी’ म्हणत. त्यामुळे कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया या सांगली जिल्ह्याच्याच ‘जीजी’ झाल्या होत्या. दुखण्यामुळे त्यांच्या कंबरेखालील संवेदना नष्ट झाल्यानंतर प्रारंभी त्या मिरज आश्रमात रहायला आल्या. त्या वेळी त्यांच्या हाडांचे दुखणे तीव्र असल्याने त्यांना असह्य वेदना व्हायच्या. त्यांना होणारा त्रास बघून ‘आपण त्यांना काहीच साहाय्य करू शकत नाही’, असे मला वाटायचे. त्याही स्थितीत जीजी सांगायच्या, ‘‘मी सेवा करते. मी ग्रंथांचे प्रदर्शन लावते’, असा माझ्यात ‘मी’पणा होता. आता बघ, मी चालूही शकत नाही. या प्रसंगातून देवाने माझा ‘मी चालते’, ‘मी करते’, हा अहं घालवला.’’ असे दृष्टीकोन घेऊन त्या सकारात्मक रहायच्या.’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली