पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी ! – डॉ. कादंबरी बलकवडे, महापालिका प्रशासक, कोल्हापूर

अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. त्यामुळे प्रशासनाने अशास्त्रीय आवाहन करण्याऐवजी धर्मशास्त्र काय सांगते, त्यानुसार आवाहन करणे अपेक्षित आहे !

नागपूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्याला आव्हान !

मूर्तीकार संघटनेची उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येतांना लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीची आवश्यकता नाही.

यंदा गोव्यात सार्वजनिक गणेशात्सव मंडळांचा सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधी करण्यावर भर

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांनी सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधींवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणातील गणेशभक्तांसाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे प्रवास आणि १ वेळचे जेवण विनामूल्य

७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता ही रेल्वे दादर (मुंबई) स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सुटणार आहे. १८ डब्यांची (बोगीची) ही रेल्वे दादर ते सावंतवाडी अशी धावणार आहे. या अंतर्गत पूर्ण प्रवास आणि एकवेळचे जेवण प्रवाशांना विनामूल्य देण्यात येणार आहे.

अमरावती येथे गणेशोत्सव मंडळात यंदाही ४ फुटांचीच श्री गणेशमूर्ती असणार !

कोरोनामुळे मूर्तीकारांना आर्थिक झळ !

‘आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड योग’ यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पार्थिव महागणपतिपूजन कार्यशाळेचे आयोजन

२७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते ११.३० या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत पार्थिव श्री गणेशाचे पूजन कसे करावे, हे शिकवले जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणार्‍यांना लस घेतलेली असली, तरी कोरोना चाचणी करणे आवश्यक होण्याची शक्यता !

आतापासूनच जिल्ह्यात येणार्‍या मार्गांवर आणि रेल्वेस्थानकांवर गणेशभक्तांची तपासणी करण्याची व्यवस्था केली जात आहे

वाहतुकीसाठी बंद असलेला भुईबावडा घाट श्री गणेशचतुर्थीपूर्वी चालू करण्याची मागणी

तालुक्यातील करूळ घाटात रस्त्याचा काही भाग खचल्याने पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटातून वाहतूक चालू होती; मात्र सतत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे आता भुईबावडा घाट धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करू नका आणि प्रदूषण रोखा ! – केदार नाईक, गणेश मूर्तीकार, नागेशी, बांदोडा

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन न करता केवळ शाडूमातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींचेच पूजन करावे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होणार नाही.