मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च घोषणा आणि शिवीगाळ !

मुंबई – देहली येथील जंतरमंतर मैदानात कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचे त्यागपत्र दिले. यानिमित्त दादर रेल्वेस्थानक ते शिवाजी पार्क असा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यावतीने ‘तिरंगा’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने युवावर्ग सहभागी झाला होता. मोर्च्याच्या समाप्तीच्या भाषणात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना उद्धव ठाकरे यांनी ‘झुरळ हे विष्णूचा अवतार आहे’ असे निरर्थक आणि श्री विष्णूचा अवमान करणारे वक्तव्य केले. ‘एका झुरळाने हुकूमशहाला हरवले आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे’, असे ते म्हणाले.
१. कोणतीही सभ्य व्यक्ती उच्चारू शकत नाही, अशा अत्यंत अर्वाच्च आणि शिवराळ भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोर्चात सहभागी युवकांनी घोषणा दिल्या.
२. मोर्चाच्या शेवटी मोर्चेकर्यांपुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘हा संघर्षाचा प्रारंभ आहे. भाजप विरुद्ध भारत, असा हा संघर्ष आहे. मोदीजी, तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. आतातरी देशाकडे लक्ष द्या. संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा देशभर पेटला आहे.’’
३. या वेळी व्यासपिठावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी खासदार संजय राऊत यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांतील अन्य पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला होता.
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !