मनसे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार !

महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.

अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार !

अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. राज्याच्या राजकारणातील पालटलेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह !

अंधेरीची पोटनिवडणुकीत ‘मशाल’ आणि ‘ढाल-तलवार’ यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

निवडणूक आयोगाने पुरेसा वेळ दिला नाही ! – ठाकरे गट

निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले !

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ‘शेअर’ करत ‘जिंकून दाखवणारच !’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी रहित करावी ! – बिरसा फायटर्सची राज्यपालांकडे मागणी !

लताबाई सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. सध्या त्या शिंदे गटाच्या आमदार आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यात अनेक सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची केंद्रशासनाला शिफारस

राजकीय पक्षांच्या देणग्यांची मर्यादा निश्‍चिती करण्याचा प्रयत्न

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर ! – आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप, मुंबई

राज्यात महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप प्रथम, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर दिसून येत आहे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर गेली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व, तर काँग्रेसची पिछेहाट !

राज्यात सत्तांतर झाल्यांवर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून आले. राज्यातील ५१ तालुक्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या घोषित झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपला १२५…

थेट सरपंचपदांसह १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान  !

विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतदान होणार आहे.