रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात काढलेली भाव जागृत करणारी गुरुपादुकांची सुबक रांगोळी !

‘रांगोळीतील गुरुपादुकांकडे पाहून असे वाटले की, त्या हवेत तरंगत आहेत. रांगोळीत वायुतत्त्व आकृष्ट झाल्याचे जाणवले.’

सप्तर्षींच्या आज्ञेने वस्त्र परिधान केल्यानंतर देहात देवीतत्त्व जागृत झाल्याच्या संदर्भात श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आलेल्या दिव्य अनुभूती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेने १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. त्यावेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती देत आहोत.

वर्ष २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील आश्रमामध्ये झालेल्या गुरुपूजनाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मोगर्‍याचा हार घालण्यापूर्वी ५ मिनिटांपासून मी जेथे कार्यक्रम (‘लाईव्हस्ट्रीम’वर) पहाण्यासाठी बसले होते, त्या ठिकाणी मला मोगर्‍याचा सुगंध येत होता.

गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती

प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.