वर्ष २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील आश्रमामध्ये झालेल्या गुरुपूजनाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती

१. मोगर्‍याचा सुगंध येणे

कु. गुलाबी धुरी

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मोगर्‍याचा हार घालण्यापूर्वी ५ मिनिटांपासून मी जेथे कार्यक्रम (‘लाईव्हस्ट्रीम’वर) पहाण्यासाठी बसले होते, त्या ठिकाणी मला मोगर्‍याचा सुगंध येत होता.

२. प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे

अ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गुलाबाच्या फुलांचा हार घातला. त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले.

आ. ‘प.पू. भक्तराज महाराज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गुलाबाच्या फुलांचा हार घालत आहेत’, असे जाणवले. त्या वेळी मला सुगंधही येत होता.

३. श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवणे

‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू होता. त्या वेळी संगणकाच्या पडद्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र होते. तेव्हा त्यांच्या ठिकाणी मला श्री दत्तगुरु दिसत होते. नामजपाची गती हळूहळू वाढत गेली. त्या वेळी माझे मन एकाग्र होत होते.

४. दत्ताचा नामजप करू लागल्यावर भावगीताचे स्मरण होऊन भावजागृती होणे

त्यानंतर ‘श्री दत्तगुरूंच्या चरणांपाशी बसलेल्या श्वानांपैकी एक श्वान मी आहे’, असा भाव ठेवून मी दत्ताचा नामजप करू लागले आणि मला ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर सामोरे बसले । मला हे दत्तगुरु दिसले ।।’, या भावगीताचे स्मरण झाले अन् माझी भावजागृती झाली. तेव्हा माझा कृतज्ञताभाव वाढत गेला.

५. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्यासाठी काय काय केले ?’, हे आठवत असतांना ‘माझा जन्म केवळ त्यांच्यासाठी झाला आहे’, असे वाटू लागले.

६. स्वतःचे अस्तित्व न जाणवणे आणि शरीर हलके होऊन मन स्थिर अन् शांत झाल्याचे जाणवणे

गुरुपूजनानंतर ‘मी गुरूंशी एकरूप झाले आहे’, असे मला जाणवू लागले. त्यानंतर माझे अस्तित्व संपून मी गुरुतत्त्वाने भारित झाले. माझे शरीर हलके होऊन माझे मन स्थिर आणि शांत झाले. ‘अशी शांतता आणि स्थिरता अखंड टिकून राहू दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना करते. ‘मला गुरुपूजनाचा आनंद घेता आला’, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, ‘तुम्ही माझ्यासाठी, तसेच सर्वत्रच्या साधकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहात. आम्ही मात्र तुम्हाला अपेक्षित अशी साधना करायला न्यून पडत आहोत’, याबद्दल आम्हा बालकांना क्षमा करा. ‘पुढील प्रयत्न आमच्याकडून होण्यासाठी तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्या’, अशी तुमच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक