भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी आजपासून गोवा दौर्‍यावर

भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस

पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे गोवा निवडणूक सहप्रभारी केंद्रीय संस्कृती अन् पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी आणि भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि हे २० सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर येत आहेत. रेल्वे राज्यमंत्री दर्शना जार्दाश या १९ सप्टेंबर या दिवशी गोव्यात आल्या आहेत.

या काळात देवेंद्र फडणवीस, तसेच गोवा दौर्‍यावर येणार असलेले इतर नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे इतर सहकारी, भाजपचे आमदार, पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आदींशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, इतर मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांसमवेत बूथ स्तरावरही संवाद साधला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे प्रभारी या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांचा हा अनुभव गोव्यातील भाजपला उपयोगी पडणार असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.