लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !
२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.
अजय सिंह सेंगर यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे देशप्रेम जागृत होणे आवश्यक आहे. गांधीवादाला आदर्श समजणारे राजकीय पक्ष आणि जनता यांना गांधी यांचे खरे स्वरूप समजणे आवश्यक आहे
खासदार नवनीत राणा या ५ वर्षे भाजपसमवेत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांची बाजू ठामपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे भाजपची केंद्रीय संसदीय समिती ठरवेल, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी अवश्य यावे; पण स्वतःच्या शक्तीवर यावे.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे.
सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.
विशेष सवलती देऊनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी शासनाकडून घोषित करण्यात येणार्या योजनांचा लाभ धर्मादाय रुग्णालयांकडून दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभा यांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी अन् शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.
‘व्होट के बदले नोट’ प्रकरणात लोकप्रतिनिधींना कुठलेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.