सनातन आणि हिंदु धर्म संपवण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सनातन धर्मावर टीका करणार्‍या ‘डी.एम्.के.’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आला. सनातन धर्मावर टीका करणार्‍या लोकांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव होणार असतील, तर ‘इंडिया’ आघाडी कशासाठी निर्माण झाली, हे स्पष्ट आहे.

‘आपल्‍याला काय ? बोलून निघून जायचे’ या वक्‍तव्‍याचे मुख्‍यमंत्र्यांकडून स्‍पष्‍टीकरण !

मराठा आरक्षणाविषयीच्‍या पत्रकार परिषदेला व्‍यासपिठावर येत असतांना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे पाहून ‘आपल्‍याला काय ? बोलायचे आणि निघून जायचे.

‘हर घर सावरकर समिती, महाराष्‍ट्र शासन’ यांच्‍या वतीने ‘गणपति आरास स्‍पर्धा २०२३’चे आयोजन !

या स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी आवश्‍यक ‘गूगल फॉर्म’ आणि ‘क्‍यू.आर्. कोड’ हर घर सावरकर समितीच्‍या ‘फेसबुक पेज’वर १९ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे, तसेच स्‍पर्धेचे नियम आणि अटी तेथे दिल्‍या आहेत.

कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले; पण हिंदु धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदु धर्म संपवण्याची भाषा करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल,..

निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्‍हे लपवल्‍याच्‍या आरोपातून उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्‍त !

वर्ष २०१४ मधील विधानसभेच्‍या निवडणुकीच्‍या वेळी प्रविष्‍ट केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्‍हेगारी खटल्‍यांची माहिती दिली नसल्‍याच्‍या आरोपाच्‍या प्रकरणी प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी एस्.एस्. जाधव यांनी फडणवीस यांना दोषमुक्‍त केले आहे.

ओबीसींच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्‍याविना स्‍वस्‍थ बसणार नाही, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ सप्‍टेंबर या दिवशी स्‍पष्‍ट केले.

त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक असून ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन !

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेवर ८ सप्टेंबरला निकाल !

अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

माजी मंत्र्यांचा आदर्श घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र द्यावे ! – शरद पवार

मुंबई येथील घटनेनंतरही माजी गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील यांनी त्यागपत्र दिले होते. पूर्वीच्या या उदाहरणांतून फडणवीस यांनी प्रेरणा घेऊन त्यावर विचार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

उदयनिधी स्‍टॅलिन यांना महाराष्‍ट्रात पाय ठेवू देऊ नका ! – मंगल प्रभात लोढा, मंत्री

श्री लोढा म्हणाले, सनातन धर्माविषयी बेताल वक्‍तव्‍य करून लाखो लोकांच्‍या भावना दुखावण्‍याचा उदयनिधी स्‍टॅलिन यांना काय अधिकार ? त्‍यांच्‍या द्वेष पसरवणार्‍या वक्‍तव्‍यामुळे महाराष्‍ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही.