‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कृषी साहाय्यकास लाच स्वीकारतांना अटक !

लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत ‘बायोमायनिंग’च्या कामामध्ये अपव्यवहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत

धाराशिव नगरपरिषदेच्या अंतर्गत बायोमायनिंगच्या कामामध्ये अपव्यहार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाईची मागणी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केली.

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने संमत !

केंद्रशासनाच्या लोकपाल कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्यासाठीचे लोकायुक्त विधेयक २८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. यापूर्वीच्या कायद्यामध्ये पालट करून नव्या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाचाही समावेश कण्याची तरतूद असणार आहे.

शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये अयोग्य प्रकार चालू आहे का ?, याची पडताळणी करू ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शालेय पोषण आहाराच्या अन्न तपासणीची यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. त्यामुळे सक्षम तपासयंत्रणा शासनाने निर्माण करावी. राज्यात पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे साटेलोटे आहे.

भ्रष्टाचाराची चौकशी सरकारी अधिकार्‍यांकडून परस्पर बंद !

भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देवनिधी लुटणारे महापापीच होत. अशांना शिक्षा न करणे, हा एक प्रकारे धर्मद्रोहच आहे ! भ्रष्टाचार्‍यांसह त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्वांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील वेळकाढूपणा !

श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये काही वर्षांपूर्वी अपहार झाला. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये हिंदु जनजागृती समितीने याचिका  प्रविष्ट केली आहे. या सुनावणीविषयी आणि सरकारने घेतलेली भूमिका याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

सिंधुदुर्गामध्ये आर्.टी.ओ. कार्यालयाचा भ्रष्ट कारभार, ११६ वाहनांची बोगस नोंदणी !

भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्‍यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा.

महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन आणि वैद्यकीय साहित्यात भ्रष्टाचार प्रकरणी जालनामधील जिल्हा वैद्यकीय अधिकारी निलंबित !

डॉ. तानाजी सावंत यांनी वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२१ आणि २२ या कोरोनाच्या कालावधीत आरोग्यक्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे असे आश्वासन दिले.

गायरान भूमी घोटाळा आणि कृषी महोत्सवासाठी अधिकार्‍यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप !

अधिकाराचा गैरवापर करून गायरान भूमी एका व्यक्तीला दिल्याप्रकरणी, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी अयोग्य पद्धतीने पैसे वसूल केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, यासाठी २६ डिसेंबर या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.