कोणतीही अनोळखी ‘लिंक’ न उघडता ती ‘डिलीट’ करा !

सध्या समाजात विविध प्रकारच्या फसव्या आणि बनावट संदेशाच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती ‘हॅक’ करू शकणार्‍या ‘लिंक’ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत…

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका ! 

वाहन दुरुस्ती करण्याच्या सेवेसाठी आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता !

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या ठिकाणी विविध सेवांसाठी दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती करू शकणार्‍यांची तातडीने आवश्यकता आहे.

कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी सेवारत होण्याची सुसंधी साधा !

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. या दृष्टीकोनातून समाजाची सात्त्विकता वाढवणारी आणि समाजाला आवश्यक असलेली कलाकृती सिद्ध करण्याचे कार्य चालू आहे…

पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो.

साधना करून व्यक्तीने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यास तिचे नाव, आडनाव, वेशभूषा अशा तिच्या कोणत्याही गोष्टीचा तिच्या स्वतःवर परिणाम होत नसणे

व्यक्तीवर होणारा आडनावाचा परिणाम हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील आहे. जर एखादी व्यक्ती साधना करून पंचतत्त्वांच्याही पुढच्या स्तरावर, म्हणजे निर्गुण स्तरावर गेल्यास तिच्यावर आडनावाचा परिणाम होणार नाही…

भ्रमणभाषवरून येणार्‍या फसव्या संपर्कापासून सावध रहा आणि आर्थिक हानी टाळा !

गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्‍या फसवणुकीच्या घटनांविषयी ‘सनातन प्रभात’ मधून वेळोवेळी सूचना  प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.   

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांताप्रमाणे वरील आडनावे उच्चारल्यावर त्या आडनावांच्या अर्थाप्रमाणे त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात…

साधकांनो, अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

विविध प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी साधकांनी उपास्य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्तिक नामजपासह पुढील नामजप करावा.