व्याख्यानाच्या माध्यमातून ‘श्री भवानीदेवीची शक्ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रक्षेपित होत आहे’, असा भावप्रयोग घेतल्यावर ‘इंटरनेट’ची अडचण दूर होऊन बोलणे सर्वांपर्यंत पोचणे !

‘सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता.

 नेहमीच्या कृती करतांना भाव ठेवल्यावर तशा प्रकारच्या अनुभूतीही येणे !

‘आश्रमातील पाणी पितांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, चहा घेतांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, तोंड धुतांनाही ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ लावत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे शरिरात चैतन्य पसरत असल्याचे जाणवते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे गुणवर्णन !

• मायेत राहून अध्यात्म जगायला शिकवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सर्व साधकांच्या हृदयात वसलेले माझे प.पू. डॉक्टर !

कृतज्ञताभाव

‘समजा मला तुम्ही गुरु मानले, मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्वासन सर्वांसाठी आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत.