विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जालना येथील मोतीबाग तलावात मृत माशांचा खच !

औद्योगिक वसाहतीतील कारखान्‍यातील विषारी द्रव्‍य आणि रासायनिक पदार्थांची वाहतूक करणार्‍या ट्रकच्‍या ‘वॉशिंग सेंटर’चे पाणी तलावात मिसळत असल्‍यामुळे सहस्रो माशांचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

‘धाराशिव’ जिल्‍ह्याचे नाव पूर्ववत् झाल्‍याविषयी श्री धारासुरमर्दिनी मंदिरात हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने सामूहिक आरती !

जिल्‍ह्याचे नाव पूर्ववत् झाल्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने जिल्‍ह्यात जल्लोष करण्‍यात आला होता. या निर्णयाविषयी आनंद व्‍यक्‍त करण्‍यासाठी ५ मार्च या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने धाराशिव शहरातील श्री धारासुरमर्दिनी मातेच्‍या मंदिरात सामूहिक आरती करण्‍यात आली.

‘एच्‌३एन्‌२’ फ्‍लूपासून सतर्कतेची चेतावणी

‘एच्‌३एन्‌२ ’ फ्‍लू गेल्‍या दोन-तीन मासांपासून मोठ्या प्रमाणावर लोकांच्‍या आरोग्‍यासाठी धोका ठरला आहे, असे ‘आयसीएमआर’च्या शास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे.

बेळगाव-कोल्‍हापूर प्रत्‍येक अर्ध्‍या घंट्याला विनाथांबा बससेवा !

सध्‍या या मार्गावरील गाड्या बेळगाव, हत्तरगी, संकेश्‍वर, निपाणी येथून कोल्‍हापूरला येत होत्‍या. आता विनाथांबा गाडी उपलब्‍ध झाल्‍याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

सोलापूर येथील जागरूक धर्मप्रेमींनी रोखली देवतांच्‍या चित्रांची विटंबना !

ही विटंबना रोखण्‍यासाठी येथील धर्मप्रेमींनी अनुमाने देवतांची इतरत्र पडलेली २५० चित्रे गोळा करून पंचमूर्ती देवस्‍थान येथे अग्‍नि समर्पित केली. या वेळी उपस्‍थितांनी प्रार्थना करून हिंदु राष्‍ट्र स्‍थानेसाठी प्रतिज्ञा घेतली.

आज अंगणवाडी सेविकांचा पुणे येथे मोर्चा आणि लाक्षणिक उपोषण !

अंगणवाडीत मदतनीस म्‍हणून नियुक्‍तीसाठी दहावी ऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण तसेच मुख्‍यसेविका म्‍हणजे पर्यवेक्षक पदभरतीसाठी सेविकेचे कमाल वय ४५ वर्षे अशा अटी प्रशासनाने समाविष्‍ट केल्‍या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्‍या झालेल्‍या दरवाढीच्‍या निषेधार्थ करवीर ठाकरे गटाची निदर्शने !

केंद्रात भाजप शासन आल्‍यापासून खाद्योपयोगी वस्‍तूंपासून अनेक वस्‍तूंचे भाव वाढत आहेत. त्‍यातच केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलेंडर आणि इंधन यांची दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य जनता महागाईच्‍या आगीत होरपळत आहे.

‘कट प्रॅक्‍टिस’ची कीड संपवा !

रुग्‍णांच्‍या परिस्‍थितीचा अपलाभ घेणार्‍या या प्रवृत्तीला आळा घालण्‍यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्‍याचे स्‍वागतच करील. कायदा हा अन्‍यायाच्‍या विरोधात दाद मागण्‍याचा हक्‍क पीडितांना मिळवून देतो.