बेळगाव-कोल्‍हापूर प्रत्‍येक अर्ध्‍या घंट्याला विनाथांबा बससेवा !

बेळगाव – प्रवाशांच्‍या सोयीसाठी, तसेच वेळेत बचत होण्‍यासाठी ९ मार्चपासून बेळगाव-कोल्‍हापूर या मार्गावर प्रत्‍येक अर्ध्‍या घंट्याला विनाथांबा बससेवा चालू करण्‍यात येत आहे. बेळगाव आणि चिकोडी आगारातून नवीन १२ गाड्या या मार्गावर धावणार आहेत. सध्‍या या मार्गावरील गाड्या बेळगाव, हत्तरगी, संकेश्‍वर, निपाणी येथून कोल्‍हापूरला येत होत्‍या. आता विनाथांबा गाडी उपलब्‍ध झाल्‍याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मध्‍यवर्ती बसस्‍थानकातून सुटणार्‍या या गाड्या प्रतिदिन सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० पर्यंत उपलब्‍ध असणार आहेत. या गाड्यांसाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्‍यात आली नसून नेहमीच्‍याच दरात या गाड्या प्रवाशांना उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत.