देवतांची जीर्ण झालेली रस्त्यावरील चित्रे गोळा करून अग्नि समर्पित केली
सोलापूर, ७ मार्च (वार्ता.) – येथील जुना विडी घरकुल भागातील धर्मप्रेमींनी पंचमूर्ती मंदिरांच्या परिसरात इतरत्र ठेवण्यात आलेल्या देवतांच्या चित्रांची विटंबना रोखली. परिसरातील नागरिकांनी विविध मंदिरांच्या परिसरात देवतांची जीर्ण झालेली चित्रे इतरत्र ठेवली होती. त्यामुळे देवतांची विटंबना होत होती. ही विटंबना रोखण्यासाठी येथील धर्मप्रेमींनी अनुमाने देवतांची इतरत्र पडलेली २५० चित्रे गोळा करून पंचमूर्ती देवस्थान येथे अग्नि समर्पित केली. या वेळी उपस्थितांनी प्रार्थना करून हिंदु राष्ट्र स्थानेसाठी प्रतिज्ञा घेतली.
या वेळी पंचमूर्ती मंदिराचे उत्सव अध्यक्ष श्री. दीपक बोलबत्तीन, सर्वश्री गणेश बोद्दूल, अनिल म्हंता, विशाल देवनपल्ली, यश मुगड्याल, मोहन पिरमल, भरत अडकी, गणेश आरकेल, राहुल तलकोकूल, अमर आरकेल, विशाल हब्बा, आेंकार येरला, बद्रीनाथ कोटा, मल्लेश मारा, वैभव गुर्रम आदी धर्मप्रेमी उपस्थित होते. (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने देवतांच्या जीर्ण झालेल्या प्रतिमा अग्नि समर्पित कराव्यात अथवा नदी-समुद्रात विसर्जित कराव्यात हे ज्ञात नसल्याने ते देवालय, झाड अशा ठिकाणी ठेवून देतात. यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
विशेष – या उपक्रमामध्ये पंचमूर्ती देवस्थान ट्रस्टनेही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.