‘धाराशिव’ जिल्‍ह्याचे नाव पूर्ववत् झाल्‍याविषयी श्री धारासुरमर्दिनी मंदिरात हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने सामूहिक आरती !

श्री धारासुरमर्दिनी मंदिरात उपस्‍थित हिंदुराष्‍ट्र सेनेचे कार्यकर्ते

धाराशिव, ७ मार्च (वार्ता.) – केंद्र सरकारची धाराशिव नामकरणासाठी अधिकृत अनुमती प्राप्‍त झाल्‍याने सर्व शासकीय विभागात ‘धाराशिव’ नामकरण करण्‍यात येत आहे. या निर्णयाविषयी आनंद व्‍यक्‍त करण्‍यासाठी ५ मार्च या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने धाराशिव शहरातील श्री धारासुरमर्दिनी मातेच्‍या मंदिरात सामूहिक आरती करण्‍यात आली. हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने जिल्‍ह्याचे नाव पूर्ववत् धाराशिव करण्‍यासाठी मागील अनेक वर्षांपासून जिल्‍ह्यात विविध स्‍वरूपात आंदोलने करून नामांतराची चळवळ चालू होती. जिल्‍ह्याचे नाव पूर्ववत् झाल्‍यामुळे हिंदु राष्‍ट्र सेनेच्‍या वतीने जिल्‍ह्यात जल्लोष करण्‍यात आला होता.

या वेळी जिल्‍हा संघटक श्री. परीक्षित साळुंके, तसेच सर्वश्री सुदर्शन वाघमारे, विक्रम साळुंके, विशाल चांदणे, प्रथमेश जगदाळे, अभिजित रोंधवे, आदर्श साळुंके, सौरभ कदम, गणेश धनके, अविनाश चौगुले, श्रीकांत कुलकर्णी, सौरभ फुलसुंदर, सतीश गवंडी, अनुराग मिसाळ, नारायण पिंपळे, वैभव गवळी, प्रथमेश शिंदे, अतुल तापरे आदी कार्यकर्ते उपस्‍थित होते.