साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात.

साधनेत अडथळा आणणार्‍या गोष्टींचा त्याग करा !

‘जी गोष्ट ऐकल्याने तुमची भक्ती, साधना, तुमचा सुसंग (चांगला संग), तुमची श्रद्धा आणि तुमचा भगवत्मार्ग डगमगतो, त्या गोष्टी विषासमान असून त्यांचा त्याग करा.’

सप्तलोकांचे अर्थ

सनातन धर्मात ‘सप्तलोक’ सांगितले आहेत. देवाच्या कृपेने मला सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्यांचे अर्थ प्राप्त झाले. ते पुढे दिले आहेत.

विजेरीचा प्रकाश आणि अध्यात्मातील उन्नतांच्या बोटांतून प्रक्षेपित होणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश यांतील भेद !

विजेरीचा प्रकाश अंधाराच्या दिशेने सोडल्यास काही अंतरापर्यंत तो स्पष्ट दिसतो; पण अंतर वाढवत गेल्यास प्रकाश अस्पष्ट होत जातो. याउलट अध्यात्मातील उन्नतांच्या हाताच्या बोटांतून बाहेर पडणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश जवळच्या अंधारापेक्षा दूरच्या अंधारात आणखी स्पष्ट दिसतो.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन !

‘अन्न ही ब्रह्मरूपी चेतना आहे. अन्न ग्रहण करतांना आपल्यातील चेतना अन्नातील चेतनेला ग्रहण करत असते. हे एक प्रकारे आत्म्याचे भोजन किंवा चेतनेचा संयोग असतो.

सुख-शांती कशात आहे ?

अरे माझ्या दुष्ट मना ! तू निराशेची प्रतिमा (मूर्ती) आहेस, जे काही भगवंताने तुला दिले आहे, त्यासाठी तू त्याचे आभार मान, इच्छा कधी कुणाच्याच पूर्ण झाल्या नाहीत. सुख-शांती तर संतोषात (समाधानात) आहे.

आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग

‘आत्मविद्या मिळवण्यासाठी जितकी तळमळ असेल, तितके तुमचे शरीर संयमी होईल. त्यामुळे मनाचे संसाराप्रती असणारे आकर्षण न्यून होईल. संसाराचे आकर्षण जितके न्यून होईल, तितके तुमचे मन प्रसन्न राहील.

स्‍वत:च्‍या संकल्‍पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्‍ण ! – विनोद कुमार यादव, वैशाली, बिहार

पांडवांच्‍या पक्षात प्रत्‍यक्ष भगवान श्रीकृष्‍णांनी सुद्धा आपला संकल्‍प मोडला. युद्धापूर्वी ते म्‍हणाले होते, ‘मी शस्‍त्र उचलणार नाही.’ तथापि भगवान श्रीकृष्‍णांनी सांगितले, ‘माझे वचन मोडले, तरी चालेल; परंतु हे धर्मयुद्ध जिंकले पाहिजे.’ यासाठीच भगवान श्रीकृष्‍ण यांनी रथाचे चाक हातात घेतले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.