मानवांनो, ममत्वाच्या कारावासातून मुक्तता करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हा !

आम्ही अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’

मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

‘जसजसा तुमचा आहार शुद्ध होईल, तसतसे तुमचे विचार शुद्ध होतील. जसजसा तुमचा संग शुद्ध होईल, तसतसे तुमचे कर्म शुद्ध होईल आणि जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल, तसतसे तुमचे मन शुद्ध होऊन परम शुद्ध परमात्म्याचा आनंद मिळवण्यात ते सफल होईल.’

आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतीकारी पालट करणार्‍या अन् पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पू. दादाजींचा जन्मदिवस १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठ्या आनंदाने साजरा करतो. त्यानिमित्ताने . . .

कर्मे योग्य रितीने केली; म्हणजे त्यांच्या बंधनात कुणी अडकत नाही

‘श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ‘ ज्या कर्मांमुळे आपण पाशात गुंतत जाऊ’, असे वाटते, ती कर्मेच योग्य रितीने केली; म्हणजे ती सर्व प्रकारच्या बंधनांतून सोडविण्यास सहाय्यभूत होतात.’

शरीर व्‍याधीने ग्रासले असले, तरी ते ध्‍यान, उपासना आणि आराधना यांच्‍या आड येत नाही ! 

अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नतेमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.

स्‍वतःचा वेळ वाया घालवणे, हे देवाचा वेळ वाया घालवण्‍यासारखे आहे !

‘देवाने आपल्‍याला साधनेसाठी पृथ्‍वीवर जन्‍म दिला आहे; मात्र काही साधक अनावश्‍यक विषयांवर बोलणे, भ्रमणभाषवर (मोबाईलवर) गप्‍पा मारणे, भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी संच (टीव्‍ही) यांवर मनोरंजनपर कार्यक्रम पहाणे इत्‍यादींमध्‍ये वेळ वाया घालवतात.

साधकांनो, परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत यांनी काही सांगितल्‍यास ‘त्‍यांचा संकल्‍प झाला’, असे म्‍हणून न थांबता साधनेचे प्रयत्न योग्‍य प्रकारे करून त्‍यांचा संकल्‍प फलद्रूप झाल्‍याची अनुभूती घ्‍या !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत एखाद्या सत्‍संगात साधकांना सांगतात, ‘‘आता तुमची आध्‍यात्मिक प्रगती चांगली होईल.’’ त्‍यानंतर साधक त्‍याविषयी इतर साधकांशी बोलतांना सांगतात, ‘‘आता परात्‍पर गुरु डॉक्‍टर / संत यांचा संकल्‍प झाला आहे.

साधकांनो, पितरांच्‍या श्राद्धविधीविषयी विचारपूर्वक बोला !

‘सध्‍या पितृपक्ष चालू असल्‍याने बर्‍याच साधकांच्‍या घरी महालय श्राद्ध करण्‍यात येत आहे, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातही श्राद्धविधी करण्‍यात येत आहेत. श्राद्धाविषयी बोलतांना काही साधक म्‍हणतात, ‘‘आज आमचे श्राद्ध आहे.’

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने नैराश्यासारखे सर्व रोग बरे होणे किंवा ते न होणे !

ईश्‍वरावर श्रद्धा नसल्याने नैराश्यापासून सुटका करून घेण्यासाठी माणसे मादक पदार्थांकडे वळतात. झोपेची औषधे घेतात. हे यावरील तोडगे आहेत का ? श्रद्धेने हे सगळे रोग पहाता पहाता बरे होतात. नव्हे, तर असे रोगच होत नाहीत. खरोखर श्रद्धा हे औषधच आहे !

पुढच्या जन्मासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार

ज्ञानयोगाचा अभ्यास उरलेल्या आयुष्यातच केला, तर त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. ईश्‍वर ज्या कार्यासाठी पुन्हा जन्माला घालेल, ते कार्य करता येईल.’