दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुर्‍हाड दाखवून दहशत माजवणारा अटकेत !; मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करणार्‍याला अटक !…

पादचारी, रिक्‍शाचालक यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून त्‍याने रिक्‍शाच्‍या काचा फोडल्‍या. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून आरोपी नीलेश शिंगारे याला अटक केली आहे.

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता सांगलीत येणार

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता २२ नोव्‍हेंबरला सांगलीत येणार आहेत. त्‍या दिवशी सांगलीतील विविध सामाजिक संघटनांमध्‍ये काम करणार्‍या महिलांशी संवाद साधून त्‍या मार्गदर्शन करणार आहेत

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्‍यवस्‍थेचे उद्दिष्‍ट गाठण्‍यासाठी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत ३४१ शिफारसी सादर !

१७ नोव्‍हेंबर या दिवशी झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत राज्‍य आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल सादर करण्‍यात आला. यामध्‍ये राज्‍याचे १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्‍यवस्‍थेचे उद्दिष्‍ट गाठण्‍यासाठी विविध ३४१ शिफारसी आर्थिक सल्लागार परिषदेकडून सादर करण्‍यात आल्‍या.

राज्‍यात समूह विद्यापिठे स्‍थापन करण्‍यासाठी राज्‍यशासन प्रोत्‍साहन देणार ! – राज्‍य मंत्रीमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्‍यातील शैक्षणिक संस्‍था बळकट व्‍हाव्‍यात, तसेच सर्व राज्‍यांमध्‍ये एकसमान शैक्षणिक धोरण राबवता यावे, यासाठी राज्‍यात समूह विद्यापीठे स्‍थापन करण्‍याचा निर्णय १७ नोव्‍हेंबराच्‍या राज्‍यमंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

दीपावलीच्‍या कालावधीत कोल्‍हापूर एस्.टी. विभागाला ७ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न !

दीपावलीच्‍या कालावधीत तिकीटदरात १० टक्‍के हंगामी वाढ करण्‍यात आली होती. त्‍याचा लाभही एस्.टी.च्‍या उत्‍पन्‍न वाढीवर झाला.

ओबीसींना ज्‍या निकषावर आरक्षण दिले, त्‍याच निकषावर आम्‍हालाही आरक्षण द्या ! – मनोज जरांगे-पाटील

१ डिसेंबरपासून प्रत्‍येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्‍हेंबरला सकल मराठा समाजाच्‍या वतीने आयोजित सभेत बोलत होते.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.

पुणे येथे एका मशिदीत गेलेल्या ९ वर्षीय मुलावर वासनांध कर्मचार्‍याकडून लैंगिक अत्याचार !

महंमद युसुफ असे आरोपीचे नाव असून तो सध्या पसार आहे. अशा मशिदींना टाळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ घंटे दर्शन !

यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे.

सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण चालू 

अवैधरित्या मासेमारी करणार्‍या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.