‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून सभेची फलनिष्पत्ती वाढवा !
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील अडथळे दूर होऊन ती निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी सनातनचे संत किंवा ६० टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक नामजप करतात. सभेपूर्वी आणि सभेच्या दिवशी त्यांनी करावयाचे नामजपादी आध्यात्मिक उपाय पुढे दिले आहेत.