‘हल्ली बरेच साधक त्यांच्या परिचितांना ‘तुम्ही त्या गावी जात आहात, तर तेथे आमचा आश्रम आहे, तोही बघून या’, असे सुचवतात. त्यातील काही जणांना अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांपैकी कशाचीही आवड नसते. अशा व्यक्ती आश्रमात केवळ ‘एक पर्यटनस्थळ बघणे’ या उद्देशाने येतात. त्यामुळे त्यांना आश्रमदर्शनाचा खर्या अर्थाने काहीच लाभ होत नाही. त्याचबरोबर ते आश्रमात आल्यावर त्यांचा पाहुणचार करण्यात साधकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे साधकांनी सनातनचा आश्रम बघण्यासाठी अध्यात्म, साधना, राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठीचे कार्य यांसारख्या विषयांच्या संदर्भात जिज्ञासा किंवा तळमळ असणार्यांनाच पाठवावे.’