साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !

‘जिज्ञासूंना साधनेकडे वळवण्याचे आणि धर्मप्रेमींना प्रत्यक्ष कृतीला उद्युक्त करण्याचे सर्वाेत्कृष्ट माध्यम म्हणजे नियतकालिक ‘सनातन प्रभात’ ! हे नियतकालिक नियमित वाचून वाचकांमध्ये साधनेची गोडी निर्माण होत आहे, तसेच त्यांच्यात राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दलचे प्रेम वाढत आहे. ‘या अंकाच्या वाचनाने आम्हाला पुढची दिशा आणि मार्गदर्शन मिळते’, असे काही वाचक उत्स्फूर्तपणे सांगतात.

असे असतांनाही ‘प्रथम भेटीतच जिज्ञासूंना वाचक बनण्यास कसे सांगू ? त्यांच्याशी जवळीक साधून नंतर वाचक होण्यासाठी प्रवृत्त करूया’, असे बर्‍याच साधकांना वाटते. त्यामुळे ते जिज्ञासूंना वाचक होण्यासाठी तत्परतेने उद्युक्त करत नाहीत.

आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.’

(१९.१२.२०२३)