साधक आणि कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !
प्रत्यक्ष सभा चालू असतांना पुढील उपाय करावेत !सभेला उपस्थित असलेल्या जिज्ञासूंवर त्रासदायक शक्तीचे आवरण येऊन त्यांना विषय आकलन होण्यात अडचण येऊ शकते. यामुळे सभा चालू असतांना अधूनमधून मैदानाच्या वा सभागृहाच्या कोपर्यांमध्ये विभूती फुंकरावी, उदबत्ती लावावी, तसेच पाण्यात गोमूत्र मिसळून ते शिंपडावे. |
‘सध्या अनेक जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘सभेतील अडथळे दूर होऊन ती निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी सनातनचे संत किंवा ६० टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक नामजप करतात. सभेपूर्वी आणि सभेच्या दिवशी त्यांनी करावयाचे नामजपादी आध्यात्मिक उपाय पुढे दिले आहेत.
१. नामजप : ‘निर्विचार’
२. मुद्रा : तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे
३. प्रार्थना : ‘हे श्रीकृष्णा, … येथील सभेत येणारे सर्व अडथळे नष्ट होऊन सभा निर्विघ्नपणे पार पडू दे. सभेची अपेक्षित फलनिष्पती मिळू दे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक जणांचे संघटन होऊन ते कार्यरत होऊ देत’, अशी प्रार्थना आहे.’
सभेच्या सेवेत स्थानिक स्तरावर काही अडथळे येत असल्यास त्यांचाही प्रार्थनेत उल्लेख करावा. ही प्रार्थना सभेच्या आदल्या दिवशी आणि सभेच्या दिवशी प्रत्येक अर्ध्या ते एक घंट्याने करावी.
संत वा साधक यांनी किती घंटे नामजप करावा ?
उत्तरदायी साधकांनी वरीलप्रमाणे नामजप करण्यासाठी संत अथवा ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक यांचे पूर्वनियोजन करावे.’