हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता ! – दत्तात्रेय होसाबळे, सरकार्यवाह, रा.स्व.संघ

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता असून यासाठी समन्वय, परस्पर सहयोग, माहितीची आदान-प्रदान आदी आवश्यक आहे. हिंदु संस्कृतीने जगाला प्रचंड प्रमाणात योगदान दिले आहे.

‘हिंदुत्व’ शब्दासाठी ‘हिंदुइझम्’ या शब्दाचा होणारा वापर रोखणार !

‘हिंदुत्व’ शब्दाला इंग्रजीत ‘हिंदुइझम्’ असा शब्द वापरणे, हा हिंदुत्वाच्या चांगुलपणावर आक्रमणासारखा आहे. ‘हिंदुत्वा’ला ‘हिंदुनेस’ असेही म्हटले जाऊ शकते’, असा प्रस्ताव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये संमत करण्यात आला.

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी ! – श्रेथा थाविसिनी, थायलंडचे पंतप्रधान

हिंदु धर्माची महानता थायलंडच्या पंतप्रधानांना कळते; मात्र भारतातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

Anti-Drone System : तुये (गोवा) येथे ‘काउंटर-ड्रोन’ कारखाना येणार

काउंटर-ड्रोन म्हणजे ड्रोनविरोधी यंत्रणा : गोव्यातील तरुण या ठिकाणी नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. हे आस्थापन उत्पादनाची निर्यातही करते. २ वर्षांच्या कालावधीत येथे प्रत्यक्ष उत्पादनही चालू होणार आहे.

Tax Defaulters : मुरगाव (गोवा) नगरपालिकेने ऐन दिवाळीत थकबाकीदारांच्या दुकानांना ठोकले टाळे !

दंडाचीच भाषा समजणारे अप्रामाणिक दुकानदार आणि आस्थापने ! मुरगाव पालिकेने थकबाकी वसुलीसाठी अनेक आस्थापनांना मिळून सुमारे २०० नोटिसा पाठवल्या होत्या; मात्र एकानेही याला दाद दिली नव्हती !

Threat To Journalist : पत्रकाराला धमकी दिल्याच्या प्रकरणी कणकवली (सिंधुदुर्ग) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद

भगवान सुरेश लोके यांनी ‘डॉ. आचरेकर यांच्यापासून जीवितास धोका पोचेल, अशा आशयाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Report Sexual Aabuse To Police : लैंगिक शोषणाविषयीची घटना घडल्यावर १२ घंट्यांच्या आत पोलिसांना कळवा ! – बाल हक्क संरक्षण आयोग, गोवा

बाल हक्क संरक्षण आयोगाने अशा घटना घडूच नयेत, यासाठीही प्रयत्न करावेत !

दत्तात्रय वारेगुरुजी यांना यंदाचा ‘सावली’ पुरस्कार घोषित ! – किशोर देशपांडे, सावली

कोल्हापूरमधील ‘सावली केअर सेंटर’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ध्येयवेड्या पद्धतीने काम करणार्‍या सेवाव्रतीला देण्यात येणारा २०२३ चा ‘सावली’ पुरस्कार शिक्षणक्षेत्रात चमत्कार घडवणार्‍या श्री. दत्तात्रय वारेगुरुजींना देण्याचा निर्णय सावलीच्या निवड समितीने घेतला आहे

२६ आणि २७ नोव्हेंबरला कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा पर्वकाल ! – अभिनव गिरी

श्री क्षेत्र प्रयाग येथे श्री संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळापासून असणार्‍या कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक येतात. या वर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपासून ते २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता !

७ डिसेंबरपासून चालू होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ४ दिवस पुढे ढकळले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशन ११ डिसेंबरपासून चालू होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी सुतोवाच केले आहे;