|
बँकॉक (थायलंड) – ‘हिंदुत्व’ शब्दाला इंग्रजीत ‘हिंदुइझम्’ असा शब्द वापरणे, हा हिंदुत्वाच्या चांगुलपणावर आक्रमणासारखा आहे. ‘हिंदुत्वा’ला ‘हिंदुनेस’ असेही म्हटले जाऊ शकते’, असा प्रस्ताव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये संमत करण्यात आला.
या प्रस्तावात पुढे म्हटले आहे की,
१. ‘हिंदु’ शब्द ‘सनातन’ या शाश्वताला दर्शवतो. धर्माचा अर्थ आहे, ‘जो कायम रहातो.’ जो शाश्वत रूपात सर्व काही धारण करतो, ज्यात एक व्यक्ती, परिवार, समाज आणि निसर्ग आहे, जे हिंदु धर्माचे प्रतीक आहे. ‘हिंदुइझम्’ पूर्णपणे वेगळे आहे; कारण यात ‘इझम्’ शब्द जोडला गेला आहे. तो दडपशाही आणि भेदभाव यांचे प्रतीक आहे.
२. १९ व्या शतकाच्या मध्यामध्ये अमेरिकेत ‘इझम्’ शब्दाचा वापर आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आंदोलनाला अपमानजनक पद्धतीने दर्शवण्यासाठी करण्यात आला होता. वर्ष १८७७ मध्ये ख्रिस्ती सोसायटीने तिच्या पुस्तकात पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला होता. हे बौद्धीकदृष्ट्या चुकीचे आहे. गेल्या १५० वर्षांत हिंदुविरोधी गोष्टींमागे हा शब्द एक कारण बनले आहे.
३. आमच्या मागील पिढीने ‘हिंदुइझम्’च्या तुलनेत ‘हिंदुत्व’ शब्दाच्या वापराला प्राधान्य दिले; कारण ‘हिंदुत्व’ शब्द अधिक चपखल आहे आणि ‘हिंदु’ शब्दाचाही अर्थही यात समाविष्ट आहे. हिंदुत्वाचा इंग्रजी अर्थ ‘हिंदुनेस’ असा आहे.
४. सार्वजनिक चर्चेमध्ये काही शिक्षणतज्ञ आणि बुद्धीवादी हिंदुत्वाला हिंदु धर्माच्या विरुद्ध आणि नकारात्मक स्तरावर चित्रित करत असतात. यातील काही जण ‘अज्ञानतेमुळे केले’, असे म्हणतात; मात्र बहुतांश लोक हिंदु धर्माविषयी त्यांचा द्वेष आणि पूर्वग्रह यांमुळे हिंदुत्वविरोधी असतात.
५. राजकीय धोरण आणि व्यक्तीगत पूर्वग्रह यांमुळे प्रेरित राजकीय नेते सनातन धर्माचा सातत्याने विरोध करणार्यांच्या गटात सहभागी झालेले आहेत.