गोव्यातील ‘गोमेकॉ’मध्ये मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याने १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. १३ मेच्या रात्री २ ते १४ मेच्या सकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांचा देहत्याग !

वडाळा महादेव येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांनी १४ मेच्या पहाटे साडेसहा वाजता श्रीरामपूर येथील गुरुदेव काटेस्वामी आश्रमात देहत्याग केला. त्यांचे वय ६१ वर्षे होते. १५ मे या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

…तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायला हवे का ?

शासनकर्त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना सामोरे जाऊन त्यांचे शंकानिरसन करणे आवश्यक असते; मात्र ते करतांना चिडत असल्यास जनतेच्या मनात कधीतरी त्यांच्याविषयी सद्भावना निर्माण होऊ शकेल का ?

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. ती येथे देत आहोत.

शासकीय अधिवक्त्याच्या शुल्कासाठी प्रत्येक सुनावणीसाठी शासन देणार अडीच लाख रुपये

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बोलावून पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे येथील अभियंता अनंत करमुसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हाड आणि शासन यांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला आहे.

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सतर्कतेची चेतावणी !

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला १६ आणि १८ मे या दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सिद्ध रहाण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कोरोनाकाळात हिंदूंनी मांसाहार करण्याच्या वक्तव्याचा वारकर्‍यांकडून निषेध !

वक्तव्याचा अकोला जिल्ह्यातील विश्‍व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे आणि अन्य वारकरी यांनी निषेध व्यक्त केला.

वर्धा येथे दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळे आणून टाकली !

कोरोना संकटाच्या काळातील दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांत १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटलेे.

कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

माझ्या देशात लोक मृत्यूमुखी पडत असतांना मी सध्या विवाह करू शकत नाही ! – अभिनेत्री वैशाली टक्कर

‘कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पहाता मी माझा विवाह पुढे ढकलला आहे. ‘विवाह करून देश सोडून जावे’, असे मला अजिबात वाटत नाही. अशा बिकट परिस्थितीत मी आनंदी कशी राहू ? विवाहाचा उत्सव (सेलिब्रेशन) कसा साजरा करू ?