केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्यात संशयास्पदरित्या फिरणार्‍या तोतया अधिकार्‍याला अटक !

अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संरक्षण व्यवस्थेत तोतया अधिकारी घुसतोच कसा ?  असे होऊ देणारे पोलीस आणि गुप्तचर विभाग देशात लपून बसणार्‍या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा समूळ नायनाट कसा करतील ?

आतंकवादी याकुब मेमनच्या कबरीच्या उदात्तीकरणाविषयी राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना, म्हणजे त्यांच्या सहमतीने देशद्रोही याकूब मेमन याच्या कबरीवर सौंदर्यीकरण झाले आहे. लोकांना भेटण्यासाठी वेळ न देणार्‍या उद्धव ठाकरे यांनी याकूब मेमन याच्या कबरीला अलिखित अनुमती कशी दिली ? त्याचा निषेध राज्यभर होत आहे.

प्रभु श्रीरामांचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात बांदा येथील रामभक्तांचे ‘त्याग’ आंदोलन वर्षभर चालू

कोणतीही तोडफोड नाही. अपशब्द नाही. ‘बॅनरबाजी’ नाही, तसेच आस्थापनाचे नावही न घेता आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे ‘ते’ वादग्रस्त विज्ञापन दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्याचे प्रमाण उणावले !

अनंतचतुर्दशीला रायगड, रत्नागिरीला अतीवृष्टीची शक्यता ! – हवामान विभाग

बंगालच्या उपसागरात अल्प दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होऊ लागल्याने अनंतचतुर्दशीला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत अतीवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे.

पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विसर्जन हौदांमध्ये पाणी नसल्याने भाविकांकडून संताप व्यक्त !

असा हलगर्जीपणा अन्य धर्मियांच्या विषयी प्रशासनाने केला असता का ? धर्मशास्त्रविरोधी  कृती करण्याचा अट्टहास करतांना तेही नीट न करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी न सोडण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय !

१० दिवस विधिवत् पूजा केलेल्या श्री गणेशाचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील विधी आहे. असे असतांना जाणीवपूर्वक केवळ हिंदु धर्माला विरोध म्हणून आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात का ?, असा प्रश्न भाविकांच्या मनात आल्यास चूक ते

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे अंमलबजावणी संचालनालयाला निर्देश

मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामीन मिळावा, यासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत.

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार !

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची अनुमती द्यावी, या मागणीसाठी प्रविष्ट केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

नागपूर येथे मोक्का लावलेल्या बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या १५ बॅटर्‍या सापडल्या !

कारागृहातील एका बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या बॅटर्‍या येतात कुठून ? यामध्ये निश्चित बंदोबस्तातील पोलीस अथवा बंदीवानाला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांचा सहभाग असू शकतो.

नागोठणे येथे व्यसनी तरुणाकडून मित्राचा खून !

येथील १९ वर्षीय साहिल कडू याचा मृतदेह नागोठणे हायस्कूलच्या मागे पोलिसांना सापडला. २९ ऑगस्ट या दिवशी साहिल मित्रांसमवेत घरातून बाहेर गेला होता.