शीव (मुंबई) येथील तलावात घरगुती, तर चौपाटी आणि माहीम रेती बंदर येथे सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करावे – मुंबई महापालिका

शीव, चुनाभट्टी इत्यादी नजीकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. तथापि तलावाची मर्यादा लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, अशी विनंती ‘एफ् उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे.

किशोर घाटगे यांची शिंदे गटाच्या कोल्हापूर उपजिल्हाप्रमुखपदी निवड !

शिंदे गटाच्या कोल्हापूर शहर कार्यकारिणीच्या नियुक्त्या राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी २६ ऑगस्ट या दिवशी घोषित केल्या. महानगरप्रमुखपदी शिवाजी जाधव, महानगरसमन्वयकपदी जयंवत हारूगले यांची, तर उपजिल्हाप्रमुखपदी श्री. किशोर घाटगे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपने वर्ष २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील निवडणुकीच्या वेळी त्याचे सत्ताधार्‍यांना विस्मरण झाले. आता वर्ष २०२४ मध्ये ५ ‘ट्रिलियन इकॉनॉमी’ हे नवीन आश्वासन दिले जात आहे, अशी टीका राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळा’च्या वतीने पुण्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा !

‘स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मंडळा’च्या वतीने पुण्यातील शाळांमध्ये ‘भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतीकारक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत. २७ ऑगस्ट या दिवशी कर्वेनगर येथील ज्ञानदा शाळेमध्ये ही स्पर्धा पार पडली.

या वर्षीचा गणेशोत्सव दारू आणि प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार !

पुणे येथील मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी केली ‘मोरया कार्यकर्ता मंच’ची स्थापना

‘कोल्हापूर एक्सप्रेस’ लवकरच चालू होणार !

कोरोना महामारीमुळे मागील अडीच वर्षे बंद असलेली ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ लवकरच चालू करण्यात येणार आहे. ‘कोल्हापूर एक्सप्रेस’ कलबुर्गीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी ‘कलबुर्गी ते कोल्हापूर’ अशी धावेल.

पुणे येथील येरवडा कारागृहातील बंदीवानांनी शाडू मातीपासून साकारल्या श्री गणेशाच्या २५० मूर्ती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति, लालबागचा राजा यांच्या सुंदर आणि सुबक अशा मूर्ती विक्रीसही ठेवल्या आहेत. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक आणि सर्वांना परवडणार्‍या असल्याने नागरिक अधिकाधिक खरेदीस पसंती देत आहेत.

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्रीवर बंदी ! – जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

गणेशोत्सवाच्या काळात ५ व्या आणि ७ व्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जाते. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती दुसर्‍या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जित करू ! – रोहिणी शेंडगे, महापौर, नगर

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्‍या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू, असे आश्वासन नगर येथील शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अमित शहा स्वतः गुन्हेगार आहेत. ते गृहमंत्री असतांना दुसरे काय होणार, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहीत पवार यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केले होते.