नागोठणे (जिल्हा रायगड) – येथील १९ वर्षीय साहिल कडू याचा मृतदेह नागोठणे हायस्कूलच्या मागे पोलिसांना सापडला. २९ ऑगस्ट या दिवशी साहिल मित्रांसमवेत घरातून बाहेर गेला होता. ३० ऑगस्टला त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर जलद गतीने पडताळणी करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. ऑनलाईन जुगाराचे आणि अमली पदार्थाचे व्यसन असणार्या आंगरआळी येथील प्रीतेश केदारी या २३ वर्षीय आरोपी मित्राने त्याचा गळा आवळल्याची कबुली दिली आहे. आरोपीने इतरांकडून कर्जही घेतले होते आणि तो गुंडगिरीही करत होता. यात अन्य तरुणही सहभागी असण्याची शक्यता आहे.