स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव २०२०’चे उद्घाटन

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कायम गोमंतकियांच्या स्मरणात रहाणार आहे. गोवा शासन स्व. पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या विरोधात पक्षातील २७ सदस्यांच्या एका गटाने अविश्‍वास ठराव आणला आहे. अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी अविश्‍वास ठराव आणणार्‍या २७ जणांच्या घटनात्मक अधिकाराविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

सावंतवाडीत टेम्पोचालकावर प्राणघातक आक्रमण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

शहरातील जिमखाना मैदानाजवळ प्राणघातक आक्रमण करून टेम्पोचालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चंदन उपाख्य सनी अनंत आडेलकर (रहाणार सावंतवाडी) आणि अक्षय अजय भिके (रहाणार गोवा) या २ संशयितांना पोलिसांनी अटक केली.

सरकारी कर्मचार्‍यांना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह !  – चंद्रशेखर उपरकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू केल्याविषयी राज्यशासनाचे अभिनंदन करत हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केली आहे.

पितांबरीच्या ‘इंद्रधनु व्हिलेज’चे भूमीपूजन पार पडले !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.

बनावट कागदपत्रे वापरून पिंपरी पालिकेची फसवणूक करणार्‍या ठेकेदारांचे रॅकेट उघडकीस !

येथील पालिकेची विकासकामे करणार्‍या ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे.

न्यायाधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावणार्‍या धर्मांधाला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा !

पिसाळलेल्या कुत्र्यामुळे बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषण

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर साध्या साध्या गोष्टींवरील कारवाई होण्यासाठी जनतेवर आमरण उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी !

मी घरी बसून विकासकामे मार्गी लावली ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्ती यांचा संगम महाराष्ट्रात आहे.