स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर साध्या साध्या गोष्टींवरील कारवाई होण्यासाठी जनतेवर आमरण उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी !

नंदुरबार – पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षांच्या बालिकेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून नंदुरबार नगरपालिकेने बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, तसेच मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, तसेच ६ मासांपूर्वी कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले बलराज राजपूत यांचे भाऊ मोहित राजपूत हे सर्वजण १४ डिसेंबरपासून नंदुरबार नगरपरिषदेच्या समोर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

उपोषणाच्या वेळी करण्यात येणार्या मागण्या
१. मृत्युमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकदाराचा ठेका रहित करण्यात यावा.
२. अवैधरित्या असणारे उघड्यावरील मांस विक्रीचे दुकान, तसेच चिकन-मटणाचे पदार्थ बनवून विक्री करणार्या गाड्या यांवर त्वरित कडक कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालावी.
३. नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी अथवा ठेकेदार यांचा हलगर्जीपणामुळे नागरिकांना अपंगत्व आल्यास किंवा नागरिकाचा मृत्यू झाल्यास अपंगत्व आलेल्या व्यक्तीला तात्काळ २ लाख रुपये आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये हानीभरपाई नगर पालिकेने द्यावी.
४. मोकाट कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देणे, तसेच नसबंदी कार्यक्रम त्वरित राबवणे यांसह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा.
५. मोकाट गुरांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असतात. मोकाट गुरांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
६. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत पावलेली हिताक्षी माळी हिच्या कुटुंबियांना हानीभरपाई देण्यात यावी. ती हानीभरपाई मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदाराकडून वसूल करून त्वरित मुलीच्या कुटुंबियांना मिळवून द्यावी.

उपोषणास विविध संघटना, संस्था, व्यायामशाळा यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पाठिंबा पत्र देण्यासाठी ३-४ कार्यकर्त्यांनी यावे. एकाच वेळी जास्त गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे आवाहन हिंदु सेवा साहाय्य समितीने केले आहे.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !