झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या ठिकाणांवरील धाडीमध्ये २ ‘एके-४७’ रायफली सापडल्या !

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी घातल्या आहेत. त्यांच्या कपाटांमध्ये २ ‘एके ४७’ रायफली मिळाल्या आहेत.

म्हशींसोबत आंदोलन करण्याची अनुमती मागणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली

म्हशींसोबत आंदोलन करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. ‘असे केल्याने प्राण्यांच्या संदर्भातील कायद्याचे उल्लंघन होते’, असे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले.

गोरखनाथ मंदिर बाँबने उडवण्याची धमकी देणार्‍या मुबारक अली याला अटक  

भारतातील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना कधी अशा धमक्या मिळतात का ?

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून कर्नाटकात ‘वीर सावरकर रथयात्रे’ला प्रारंभ

अशा रथायात्रेद्वारे वीर सावरकर यांच्यासारख्या लोकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि बलीदान यांंविषयी लोकांना जागरूक केले जाईल.

पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे ! – टी. राजा सिंह

गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.

‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण वाढत असल्याने केंद्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशात केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘टोमॅटो फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘औरंगजेबाने ज्ञानवापीची संपत्ती दान केल्यावर तेथे मशीद बांधली गेली !’ – मुसलमान पक्षाकाराचा फुकाचा दावा

हिंदूंना त्यांच्या हक्काची धार्मिक स्थळे मिळू नयेत, यासाठी मुसलमान कशा प्रकारे दावा करत आहेत, हेच यातून दिसून येते ! ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’च्या घोषणा देणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

जम्मू येथे भाजपच्या नेत्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

कठुआ येथील एका गावातील निर्जनस्थळी भाजपचे नेते सोम राज याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेहावर रक्ताचे डाग आढळले आहेत.

बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या.

ध्वनीप्रदूषण नियमांची कार्यवाही करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश

असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? प्रशासन आणि पोलीसयंत्रणा झोपल्या आहेत का ?