तेलंगाणामध्ये अश्‍लील गाण्यात हिंदूंच्या मंत्रजपाचा वापर केल्यावरून गायकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोधाच परिणाम !
तेलुगु यू ट्यूब चॅनलने गाणे हटवले !

गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला विधानसभेसाठी निवडणूक

एकूण १८२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत १ डिसेंबरला ८९ जागांसाठी आणि ५ डिसेंबरला ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

भगवान श्रीविष्णूच्या स्नानासाठी केरळमधील थिरूवनंतपुरम् विमानतळ ५ घंट्यांसाठी बंद

मंदिराची ही पारंपरिक मिरवणूक येथील धावपट्टीजवळून जाते. या परंपरेसाठी विमानतळ बंद करण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.

दाबोळी विमानतळ बंद करणार नाही ! – व्ही.के. सिंह, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा ! – महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

९ नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल

मुंबईतील विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर निकाल दिला जाणार आहे.

७ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील बाणगंगा येथे होणार महाआरती !

मुंबईतील काशी म्हणून ओळख असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या (७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी उपस्थित रहाणार आहेत.

… तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री रहाता येणार नाही ! – उल्हास बापट, घटनातज्ञ

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरवले, तर राज्यात बहुमताचा आकडा १२० पर्यंत खाली येतो.

पुणे येथील १३० रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेणार ! – पथ विभाग प्रमुख

१३० रस्त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा अहवाल सल्लागार आस्थापनाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. त्यामध्ये काही रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती, तर काही ठिकाणी नव्याने रस्ता सिद्ध करावा लागणार आहे.

दादर (मुंबई) येथील छबीलदास शाळेत ४ सिलेंडरचा स्फोट !

दादर (पश्चिम) येथील छबीलदास शाळेत २ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजताच्या कालावधीत एकापाठोपाठ ४ सिलेंडरचे स्फोट झाले. स्फोटामुळे आग लागून ३ जण घायाळ झाले आहेत.