राज्यात ३ मासांत १३१ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस !

विजेची चोरी करणार्‍यांकडून नुसता दंड वसूल न करता दंडासह त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना कारावासाची शिक्षाही केली पाहिजे, तरच असे वीज चोरीचे प्रकार थांबतील !

पुणे येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन !

धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असून गेल्या २४ घंट्यांत दावडी पर्जन्यमापक केंद्रात ३०४ मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे; तसेच गेल्या २४ घंट्यात एकूण ४९.४९ द.ल.घ.मी. आवकाची नोंद झालेली आहे.

जालना येथे ४ स्टील व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी !

जालना येथील ४ मोठ्या स्टील कारखानदारांनी त्यांच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले; पण ते पूर्णपणे दप्तरावर न आणता रोखीत व्यवहार केले होते. याद्वारे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा संशय होता.

पुणे येथे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाइक यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

‘आरे’तील ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आता झाडे तोडणार नाही ! – आश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका

‘मेट्रो ३’च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार असून या कामात आलेल्या अडथळ्यांमुळे त्याला विलंब झाला आहे. त्यामुळे या कामाच्या निधीत १० सहस्र २७० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

नाशिक येथे खाद्यतेलाच्या आस्थापनावर अन्न सुरक्षा विभागाची धाड, १ कोटी १० लाखांचा साठा जप्त !

अन्न सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासमवेतच खाद्यतेलाचे नमुने पडताळण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.

लातूर येथील श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयात लावण्यात आले क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन !

‘श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालया’तील मुख्याध्यापिका सौ. सुनीता बोरगावकर यांच्या पुढाकाराने १० ऑगस्ट या दिवशी विद्यार्थिनींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.

‘घर घर तिथे शिवसेना सभासद नोंदणी’स गांधीनगर येथून प्रारंभ !

या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’ 

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?

मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) येथील गणेशोत्सव मंडळांचा ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे आणि आदित्य शास्त्री यांनी आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन केले.