भाजपकडून स्थानिक पक्ष संपवण्याचे घृणास्पद कारस्थान चालू आहे ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्याविषयी मला अभिमान आहे. ते माझे मित्र असून निर्भीड शिवसैनिक आहेत. त्यांचा गुन्हा काय आहे ?

खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ची कोठडी

संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘माझे देशावर प्रेम नाही’, असे काहींना वाटते; पण ते सत्य नाही !’

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तोंडावर अभिनेते आमीर खान यांचे उफाळून आले देशप्रेम !
चित्रपटावर बहिष्कार न घालण्याची विनंती

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

उस्मानाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका !

उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका शेख इस्माईल मसूद शेख आणि इतर १६ जण यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे प्रविष्ट केली आहे. अधिवक्ता सतीश बी. तळेकर यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे.

मेट्रोसाठी ‘आरे’ वसाहतीतील वृक्षतोडप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने !

‘आरे’ वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी या परिसरातील वृक्ष तोडण्यात आले होते. त्याविरोधात ३१ जुलै या दिवशी पर्यावरणप्रेमींनी आरे वसाहतीमध्ये निदर्शने केली. या आंदोलनात स्थानिक आदिवासीही सहभागी झाले होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून हत्येतील संशयित पसार !

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेला आरोपी सुनील ज्ञानेश्वर राठोड हा ३१ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजता वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे.

‘मुंबै बँके’चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अचानक त्यागपत्रे !

राज्यात सत्तापालट होऊन भाजपप्रणीत सरकार स्थापन होताच मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (‘मुंबै बँके’चे) अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी अचानक पदांची त्यागपत्रे दिली आहेत. या पदांसाठी ५ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीत निवड होणार आहे.

सांगली येथील प्रतापसिंह उद्यानात भारत-पाक युद्धातील रणगाडा बसवण्यात येणार !

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेला रणगाडा सांगलीत आणण्यात आला आहे. रंगरंगोटी करून तो प्रतापसिंह उद्यानात बसवला जाणार आहे. उद्यानात शिवसृष्टीही साकारली जाईल.

प्रत्येक शेतकर्‍याचा जीव मोलाचा असल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आम्ही अतीवृष्टीचा आढावा घेतला आहे. पावसामुळे मृत्यू झालेल्यांना साहाय्य करण्याविषयी आढावा घेतला. शेतपिकांची हानी झालेल्यांना हानीभरपाई देऊ. नवीन शिवसेना-भाजप युतीचे सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ.