‘घर घर तिथे शिवसेना सभासद नोंदणी’स गांधीनगर येथून प्रारंभ !

कोल्हापूर, ११ ऑगस्ट (वार्ता.) – करवीर पूर्व भागात शिवसेना सभासद नोंदणीस गांधीनगर व्यापारपेठेतून प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’  सहकुटुंब शिवसेनेचे सभासद करून घेण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. उंचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी, वळीवडे या भागांत ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी शाखाप्रमुख दीपक अंकल, सर्वश्री सुनील पारपाणी, किशोर कामरा, सुनील बदलाणी, जितु चावला, राजेश सचदेव यांसह अन्य उपस्थित होते.