अंघोळीसाठी औषधी पाणी

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३२

वैद्य मेघराज पराडकर

‘ताप, अंगदुखी, त्वचा विकार, तसेच कोणत्याही मोठ्या रोगामुळे आलेला थकवा यांमध्ये अडूळसा, कडूनिंब, निर्गुंडी यांपैकी कोणत्याही एका वनस्पतीची मूठभर पाने अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करावी. शक्य असल्यास अंघोळीसाठी पाणी तापवतांनाच त्यामध्ये पाने घालावीत. एका वेळी एकाच वनस्पतीची पाने घालावीत. ही पाने उपलब्ध होण्यासाठी या वनस्पतींची स्वतःच्या भोवताली लागवड करावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२३)