
नागपूर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष २०२४ मध्ये भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांना संत म्हणून घोषित केले. या पावन संतपदाने गौरवान्वित झाल्यानंतर नागपूरकर श्री गजानन महाराज भाविकांच्या वतीने धर्मभूषण अन् भारताचार्य (प्रा.) पू. सुरेश गजानन शेवडे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि जगप्रसिद्ध प्रवचनकार, लेखक, अविरत धर्मकार्य करणारे, तसेच ‘श्री गजानन बावन्नी’चे रचनाकार, धर्मभूषण अन् भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांचा जाहीर सन्मान ‘जय गजानन बहुउद्देशीय सेवा मंडळ, नागपूर’ यांच्या वतीने करण्यात आला. ‘श्री संत गजानन गाथा अमृतकण सोहळा’ या नावाने हा कार्यक्रम ४ जानेवारी २०२६ या दिवशी कवीवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे पार पडला. या कार्यक्रमाला दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मते, माजी आमदार सर्वश्री अनिल सोले, संजय भेंडे आणि रमेश बागडी यांची उपस्थिती होती.
सेवाभावी आणि साधनामय असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम अवश्य पहा ! – भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे![]() मी गेल्या दीड वर्षांपासून गोव्यातील फोंडा (गोवा) येथील रामनाथी येथे सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास आहे. तेथे माझी उत्तम निवासव्यवस्था, सेवेसाठी साधक, वेळेवर भोजन, औषधोपचार आणि लेखनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. आश्रमात येणारे साधक कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता स्वच्छता, विद्युत् कामे, बांधकाम, स्वयंपाक, लेखन आदी विविध सेवा निःस्वार्थ भावाने करतात. असा सेवाभावी आणि साधनामय आश्रम मी आजवर कुठेही पाहिलेला नाही. सर्वांनी या आश्रमाला अवश्य भेट द्यावी. |
या कार्यक्रमात ‘कलाश्रृति संस्था, नागपूर’ यांच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या चरित्रावर आधारित लघुनाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमात ‘जय गजानन आरती संकल्प’ या पुस्तकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांसह पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘श्री गजानन विजयग्रंथ’ या ग्रंथातील २१ व्या अध्यायाचे पारायण चिंचवड (जिल्हा पुणे) येथील कु. सुरभी ढगे यांनी केले. या वेळी पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
साधना, सेवा आणि निरपेक्ष भावाने जीवन जगून जन्माचे सार्थक करणे आवश्यक ! – पू. (प्रा.) सु.ग. शेवडे

सन्मानानंतर मार्गदर्शन करतांना पू. (प्रा.) सु.ग. शेवडे म्हणाले, ‘‘मनुष्यजन्म मिळणे, हे अत्यंत दुर्लभ आणि भाग्याचे आहे. साधना, सेवा आणि निरपेक्ष भावाने जीवन जगून या जन्माचे सार्थक करणे आवश्यक आहे.’’

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !