
‘१६.६.२०११ या दिवशी रात्री ११ वाजता चंद्रग्रहण चालू झाले. मी नित्यकर्मे आटोपून रात्री २ वाजता मध्यरात्री उठून हात-पाय धुऊन देवापाशी नामस्मरण करत बसले. पहाटे ४ वाजता ग्रहण सुटल्यावर मी न्हाऊन घेतले. माझ्या यजमानांना उठवले. मी कपडे धुतले आणि आमच्या तिसर्या माळ्यावरील सदनिकेच्या गच्चीमध्ये (गॅलरीत) कपडे वाळत घालण्याच्या उद्देशाने गेले. गच्चीतील तारेवर साडी वाळत टाकत असतांना अतिशय जोराचा वारा सुटला आणि साडीचा पदर हातातून निसटून गच्चीपासून ४ ते ५ फूट लांबवर असलेल्या एम्.एस्.ई.बी.च्या (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या) विद्युत तारांवर पडला. अंधारात पदर उडून विद्युत तारेवर गेल्याचे मला कळले नाही. पदराच्या थोड्याशा स्पर्शाने मला थोडा विजेचा धक्का (शॉक) बसल्याने मी ओरडले. माझ्या आवाजाने माझे पती लगबगीने गच्चीत आले आणि मला विचारत असतांनाच त्यांचा हात मला लागतो न लागतो, तोच पुन्हा साडीच्या पदराचे टोक हवेवर उडत येऊन विजेच्या तारेला चिकटले आणि विजेचा प्रवाह ओल्या वस्त्रातून आम्हा दोघांच्या शरिरात शिरला.
तो वीजप्रवाह २४० व्होल्टचा नव्हता, तर तो ११०० व्होल्टचा होता आणि वीजप्रवाह काही सेकंद संपूर्ण शरिरात गेला. उभयता त्या प्रचंड दाहात आणि विजेच्या तडाख्याने चक्क होरपळून निघालो. पती त्याच क्षणी भूमीवर पडले आणि बेशुद्ध झाले. मी अलगद जवळच असलेल्या गुलाब आणि वाळलेल्या तुळशीच्या झुडपांवर धाडकन न पडता, अलगद कुणी उचलून झुडुपांवर ठेवल्याप्रमाणे पडले होते. माझा मानेपासूनचा वरचा भाग सचेतन होता; पण धड अचेतन झाले होते. आम्ही विजप्रवाहापासून मोकळे झालो होतो, तरी सर्वत्र प्रचंड काळोखासह प्रक्षुब्ध शांतताच होती; कारण पती बेशुद्ध आणि मी बेशुद्ध नसले, तरी माझ्या मुखावाटे शब्दच फुटत नव्हता. मला माझ्या शरिराची हालचाल करणे, अशक्यच झाले होते. माझे शरीर जणू लाकडासारखेच झाल्याचे मला जाणवले. संवेदना स्तब्ध झाल्या होत्या. तशाच अवस्थेत केवळ वर आभाळातल्या चंद्राकडे पहाणेच शक्य होते. दीड ते २ मिनिटांनी माझ्या कानावर अकस्मात् ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे शब्द पडले. माझे पती हे शब्द उच्चारत अर्धवट शुद्ध असलेल्या अवस्थेत उठले. मला अतिशय हायसे वाटले; कारण आम्हा उभयंतापैकी एक जण बोलू किंवा हालचाल करू शकत होता. थोड्या वेळाने त्यांनी मला उठवले आणि आम्ही उभयता घरात आलो. पहातो, तर आमचे हात-पाय पोळून जखमा झाल्या होत्या. या जखमा बर्या होण्यास अनुमाने २ – ३ मास लागले. यावरून ‘त्या जखमा साध्यासुध्या नव्हत्या’, हे आम्हाला कळून आले.
त्याच दिवशी आम्ही आधुनिक वैद्यांना बोलावले. त्यांनी आमच्या घरी प्रत्येक ४ दिवसांनी येऊन, औषधोपचार करून आम्हास बरे केले. यावरून ‘गुरु किती साहाय्य करतात ?’, याचा प्रत्यय आम्हाला आला. दुर्घटनेतून वाचवून, आधुनिक वैद्याच्या रूपात येऊन साहाय्य करणारे दुसरे-तिसरे कुणी नव्हते, ते गुरु प.पू. दादाजी वैशंपायन होते. या घटनेच्या वेळी माझ्या यजमानांचे उपनेत्र (चष्मा) गच्चीतून खाली पडून खालच्या दुकानाच्या पत्र्यावर पडले होते. तरीही ते सुस्थितीत होते.
प.पू. दादाजींनी या सर्व घटनांपासून अप्रत्यक्षरित्या संरक्षण तर केलेच; पण त्यांनी सिद्ध केलेल्या सुरक्षा कवचाचाही प्रभाव आम्हाला जाणवला. प.पू. दादाजींनी अशा प्रसंगातून आम्हाला पूर्णपणे सोडवले आणि आमच्या दोन्ही मुलांचे छत्र हरवण्यापासून वाचवले. या उपकारांची फेड करणे, खरोखर अशक्यच आहे. अशा या प्रेममयी, ईश्वररूपी, योगतज्ञ प.पू. दादाजींच्या चरणी आम्हा उभयतांचे कृतज्ञतापूर्वक कोटीशः प्रणाम !’
– श्री. देवेंद्र क्षीरसागर आणि सौ. दीपांजली देवेंद्र क्षीरसागर, नाशिक
(साभार : साप्ताहिक सद्गुरु सुगंध, दीपोत्सव २०१२, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर)
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !