काही तज्ञांनी ही युती अव्यवहार्य असल्याचाही लावला अनुमान !

अंकारा (तुर्कीये) – मुसलमान देश तुर्कीये, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे संरक्षणात्मक युती करणार असल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून ‘इस्लामी नाटो’ची सिद्धता केली जात आहे का, अशीही चर्चा आहे. याचा अर्थ यांच्यापैकी एका देशावर आक्रमण झाले, तर ते अन्य दोघांवरील आक्रमण मानले जाऊन तेही या युद्धात उतरू शकतात किंवा आक्रमण झालेल्या देशाला साहाय्य करू शकतात. तुर्कीये आधीच नाटोचा सदस्य आहे आणि अमेरिकेनंतर त्याच्याकडे या संघटनेतील सर्वांत मोठे सैन्य आहे. ‘इस्लामी नाटो’चा दावा करणार्या ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, सौदी अरेबियाचा पैसा, पाकिस्तानचा परमाणू कार्यक्रम आणि मनुष्यबळ, तर तुर्कीयेचा अनुभव अन् विकसित संरक्षण उद्योग या तिघांचा मिलाप होऊ शकणार आहे.
🚨 Islamic NATO? A New Axis Emerges
Turkey is in talks to join a Saudi Arabia-Pakistan security pact modeled on NATO’s Article 5 🤝⚔️
➡️ Attack one, face all.
What each brings to the table:
💰 Saudi Arabia – financial muscle
☢️ Pakistan – nuclear capability, missiles &… https://t.co/52QG582rHh pic.twitter.com/E55FWNNz5o— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 15, 2026
अमेरिका प्रादेशिक पातळीवर स्वतः आणि इस्रायल यांचे हितसंबंध प्राधान्याने पहात असल्यामुळे पालटत्या संघर्षात्मक परिस्थितीत देशांना नवी सुरक्षाव्यवस्था उभारावी लागत आहे, असे तुर्कीयेच्या एक वैचारिक धोरण संस्थेने म्हटले आहे.
भारतासाठी ही ‘इस्लामी नाटो’ हानीकारक ठरेल का ?
भारतासाठी ही दुष्ट युती हानीकारक ठरू शकते कि नाही, यासंदर्भात भारतीय वायूदलाचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा म्हणाले की, ही युती प्रत्यक्षात आली, तर भारत, इस्रायल, आर्मेनिया आणि सायप्रस यांच्यासाठी गंभीर आव्हान ठरू शकते. इस्रायल आणि भारत यांच्यात वाढत असलेल्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे पाहिले पाहिजे.
भारत हा ग्रीस आणि सायप्रस यांच्याशी संबंध अधिक दृढ करत आहे. भारत आणि इस्रायल भूमध्य समुद्र क्षेत्रात अधिक समन्वय साधू शकतात. तथापि काही विश्लेषकांच्या मते भविष्यात ‘इस्लामी नाटो’सारखी युती प्रत्यक्षात येणे कठीण आहे. ‘किंग्स कॉलेज लंडन’च्या प्राध्यापिका आंद्रेयास क्रिग यांनी सांगितले की, नाटो पद्धतीचे गठबंधन व्यवहार्य नाही. याचे कारण त्यामुळे खाडी देश अशा युद्धांत ओढले जातील, जे त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी आवश्यक नाही.
‘इस्लामी नाटो’ ही संकल्पना काय आहे ?
सध्या जगात ‘नाटो’ अर्थात् ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली सैनिकी संघटना अस्तित्वात आहे. या संघटनेच्या एका नियमानुसार या संघटनेतील एका देशावर अन्य कुणी आक्रमण केले, तर ते या संघटनेत सहभागी असलेल्या अन्य देशांवर आक्रमण’, असे समजून त्या देशाला सैनिकी साहाय्य केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ‘इस्लामी नाटो’ संघटना स्थापन करण्याची इस्लामी देशांची इच्छा आहे.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’