शीख संघटनेने प्रविष्ट केली आहे याचिका

नवी देहली : भारतीय रेल्वेच्या जेवणाच्या थाळीत दिल्या जाणार्या मांसाहारी भोजनावरून ‘झटका’ आणि ‘हलाल’ मांसाहारी पदार्थांवरून वाद निर्माण झाला आहे. यावरून शीख संघटनांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रेल्वे बोर्ड, एफ्.एस्.एस्.ए.आय. (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सचिवांना नोटीस बजावली आहे.
‘Halal’ in train meals sparks controversy 🍽️@India_NHRC issues notice to Indian Railways over Halal vs Jhatka meat, after a Sikh organization’s petition.
Even Etihad Airways offers both Halal & Jhatka options to passengers. – @KanoongoPriyank
Why can’t Indian Railways ensure… pic.twitter.com/Q3u6UbufD7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2026
१. आयोगाने नोटिशीत नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये केवळ हलाल मांस दिले जात असल्यास ते प्रवाशांच्या अन्ननिवडीच्या अधिकाराचे उल्लंघन ठरू शकते. तसेच हे शीख धर्माच्या ‘रहत’ मर्यादेच्या (आचारसंहितेच्या) विरोधात आहे.
२. आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी सांगितले की, शीख रहत मर्यादेनुसार शिखांना हलाल मांस सेवनास मनाई आहे. जर शीख प्रवाशांना कोणत्या प्रकारचे मांस दिले जात आहे, याची माहिती दिली जात नसेल, तर तो त्यांच्या अधिकारांचा थेट भंग आहे.
‘हलाल’ आणि ‘झटका’ मांस यांतील भेदहलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो. |
खाद्यसंस्थांना स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश
आयोगाने सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व खाद्यविक्री केंद्रे आणि संस्था यांना स्पष्ट सूचना देण्यास सांगितले आहे की, वाढण्यात येणारे मांस हलाल आहे कि झटका ? हे ठळकपणे दर्शवावे. पारदर्शकतेचा अभाव धार्मिक स्वातंत्र्य आणि ग्राहक हक्क यांच्या विरोधात आहे.
एफ्.एस्.एस्.ए.आय.ला पाठवलेल्या नोटिशीत आयोगाने स्पष्ट केले आहे की, मांसाहारी अन्नाच्या प्रमाणपत्रांमध्ये मांस झटका आहे कि हलाल ? याचा स्पष्ट उल्लेख असावा. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या धार्मिक आणि वैयक्तिक श्रद्धा यांनुसार निर्णय घेता येईल.

इस्लामी देशांतील ‘एतिहाद एअरलाईन्स’सुद्धा प्रवाशांना हलाल आणि झटका मांस देते !
दारुल उलूम देवबंदच्या मते ‘पशूबळी मुसलमान व्यक्तीकडून केल्या जाणार्या मांसालाच हलाल मांस मानले जाते. त्यामुळे हिंदु दलित समुदायांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवले जाते, जे परंपरेने पशूबळी आणि मांसविक्री यांच्याशी जोडलेले आहेत. ‘ग्राहकांना कोणत्या प्रकारचे मांस दिले जात आहे ?’, हे जाणण्याचा पूर्ण अधिकार आहे. इस्लामी देशातील ‘एतिहाद एअरलाईन्स’सुद्धा प्रवाशांना हलाल आणि झटका अशा दोन्ही प्रकारच्या भोजनाचे पर्याय उपलब्ध करून देते.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !