मृतांमध्ये हिंदूंचा सर्वाधिक समावेश

ढाका (बांगलादेश) – ‘ह्युमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ६ जून २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत ११६ अल्पसंख्यांकांची हत्या करण्यात आली. यामध्ये बहुसंख्य हिंदू समुदायातील होते. तसेच काही बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मीय लोकांचाही समावेश आहे.
अहवालानुसार या हत्या बांगलादेशातील सर्व ८ विभागांमध्ये आणि किमान ४५ जिल्ह्यांमध्ये झाल्या आहेत. या ११६ प्रकरणांपैकी १२ प्रकरणे जमावाकडून झालेल्या हत्या होत्या, तर उर्वरित प्रकरणांमध्ये लक्ष्य करून केलेल्या हत्या, कोठडीत किंवा संशयास्पद परिस्थितीत झालेले मृत्यू, तसेच खोट्या आरोपांनंतर विशेषतः ईशनिंदेच्या आरोपांनंतर करण्यात आलेल्या हत्यांचा समावेश आहे.
Bangladesh: Minorities Under Attack
116 minorities killed in just 7 months – majority are Hindus.
A report by @hrcbm reveals: • Govt & police negligence
• FIRs delayed or denied
• Zero accountabilitySilence is enabling violence. 🚨#SaveHindusInBangladesh… https://t.co/73rzB0SU9N pic.twitter.com/1FarGmOnqu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 15, 2026
युनूस सरकारचा निष्काळजीपणा उघड
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. अनेक प्रकरणांत तक्रार उशिरा नोंदवली जाते किंवा नोंदवलीच जात नाही. चौकशी वरवरची असते, पीडित कुटुंबांना धमकावले जाते आणि आरोपींवर कारवाई जवळजवळ होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढत असून व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास ढासळत आहे.
अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, ही हिंसा थांबली नाही, तर बांगलादेशाची स्थिरता आणि सामाजिक एकता यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता व्यक्त केली जात असून अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार