|
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – पोंगल तमिळी समाजाचा पारंपरिक पीक उत्सव आहे. तो कोणत्याही एका धर्माशी किंवा जातीशी मर्यादित नाही. पोंगल सामाजिक न्याय, समता आणि सामूहिक एकता यांचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी ‘द्रविड पोंगल’ साजरा करावा, असे आवाहन तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष असलेले एम्.के. स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी सामुदायिक द्रविड पोंगल कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. त्याला भाजप आणि अण्णाद्रमुक पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, द्रमुक पोंगलमधून हिंदु धार्मिक घटक काढून टाकण्याचा प्रयत्न करत असून सणाची ओळख पालटू इच्छितो.
Tamil Nadu's Anti Hindu CM M. K. Stalin calls for ‘Dravidian Pongal’, claiming Pongal has no religious roots.
Opposed by BJP & AIADMK
What else can one expect from the DMK?
Sanatan Dharma and its festivals are eternal – beyond distortion or destruction. 🚩#Pongalcelebration… pic.twitter.com/CabwZ2qq12
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2026
भाजपचे म्हणणे आहे की, द्रमुक पोंगलला हिंदु पंचांगापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून त्याला पूर्णतः ‘धर्मनिरपेक्ष’ स्वरूप देऊ पहात आहे
अण्णाद्रमुक पक्षाचे प्रवक्ते कोवाई सत्यन् यांनी म्हटले की, द्रमुक पक्ष सणांची नावे पालटून राजकारण करत आहे. पोंगलच्या ओळखीशी छेडछाड करणे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणे होय. हे सर्व येणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात आहे.
टीकेनंतर द्रमुकचे स्पष्टीकरण
टीकेनंतर द्रमुकने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, द्रविडी पोंगलचा उल्लेख केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठी करण्यात आला होता. सामान्य जनतेच्या धार्मिक श्रद्धांमध्ये कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. पोंगल तमिळी शेतकर्यांचा सण आहे. इतर राज्यांमध्ये याला ‘मकरसंक्रांती’ म्हटले जाते, जी वेगळी परंपरा आहे.
राज्य सरकारने पोंगलपूर्वी शिधापत्रिकाधारकांना ३ सहस्र रुपये रोख रक्कम आणि पोंगल साहित्याचे पाकीट देण्याची घोषणा केली आहे.
संपादकीय भूमिकासनातन धर्माला नष्ट करण्याचे आवाहन करणार्या पक्षाकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? द्रमुक पक्षाने कितीही आवाहन केले, तरी सनातन कधीही नष्ट होऊ शकत नाही किंवा त्याचे सण, उत्सव पालटू शकत नाहीत ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !