|

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – जो देश इराणसमवेत व्यापार करेल, त्याला अमेरिकेसमवेतच्या व्यापारात २५ टक्के आयात शुल्क आकारले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ‘हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल.’ दुसरीकडे व्हाईट हाऊसकडून या शुल्काविषयी अधिकृत आदेश प्रसारित करण्यात आलेला नाही.
🇺🇸 U.S. President Donald Trump announces a 25% import duty on countries trading with Iran.
🇮🇳 India is among them.
This is economic coercion, not diplomacy.The world must unite and push back; collective resistance is the only way to end Trump’s bullying tactics. 💥🌍
PC:… pic.twitter.com/uWW3fs2FeC— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 13, 2026
अमेरिकेने यापूर्वीच इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणसमवेत व्यापार करणार्या प्रमुख देशांमध्ये चीन, संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचा समावेश आहे. शुल्क लागू झाल्यास या देशांच्या अमेरिकेसमवेतच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार इराणने वर्ष २०२२ मध्ये १४७ देशांसमवेत व्यापार केला होता.
इराणमध्ये हिंसक आंदोलनात आतापर्यंत ६४८ जणांचा मृत्यू !
इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून सरकार आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने चालू आहेत. ही आंदोलने आर्थिक संकटातून चालू होऊन आता सत्तेच्या विरोधात पोचली आहेत. नॉर्वेच्या मानवाधिकार संघटनेनुसार आंदोलनांमध्ये आतापर्यंत ६४८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सहस्रो लोक घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ९ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती समोर येत नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मृतांची संख्या ६ सहस्रांपर्यंत पोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इराणी सरकारकडून आंदोलनातील मृत किंवा घायाळ यांची कोणतीही अधिकृत संख्या घोषित करण्यात आलेली नाही.
इराण धोक्याची रेषा ओलांडत आहे ! – ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण सरकार निदर्शने थांबवण्यासाठी धोक्याची रेषा ओलांडत आहे. अमेरिका कठोर पर्यायांवर विचार करत आहे. इराणने अमेरिकेशी संपर्क साधून चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. बैठक निश्चित करण्यावर चर्चा चालू आहे. तथापि परिस्थिती पहाता त्यांना आधी कारवाई करावी लागू शकते; कारण मृतांची संख्या वाढत आहे आणि अटकसत्र चालूच आहे.
भारत-इराण व्यापाराचे महत्त्व किती ?१. अमेरिकेच्या ‘ओईसी’, म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटी’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत आणि इराण यांच्यात १.६८ अब्ज डॉलर, म्हणजेच १४ सहस्र ते १५ सहस्र कोटी भारतीय रुपयांचा व्यापार झाला. यातही भारताने अधिक मूल्याची निर्यात केली. २. भारताने बासमती आणि अन्य जातींचा भात, चहा, कॉफी, साखर, औषधे अन् रसायने, डाळी, अवजड यंत्रे, विद्युत् उपकरणे, तसेच दागिने यांची प्रामुख्याने निर्यात केली. ३. दुसरीकडे इराणकडून आपण सुकामेवा, सेंद्रीय आणि अजैविक रसायने, तसेच काही खनिजे आणि काचेच्या वस्तू आदी गोष्टी आयात केल्या. ४. भारताचा अन्य देशांशी असलेल्या व्यापाराच्या तुलनेत भारत इराणशी पुष्कळ अल्प व्यापार करतो. अमेरिका आणि चीन हे भारताचे सर्वांत मोठे व्यापारी भागीदार देश असून इराणच्या तुलनेत त्यांच्याशी भारत तब्बल १२० पट अधिक व्यापार करतो. भारताशी व्यापार करण्यात कॅनडा साधारण २० व्या क्रमांकावर असूनही इराणशी त्याच्याशी तुलना केली, तर कॅनडा आणि भारत यांच्यातील व्यापार इराणच्या किमान ८ पट आहे. ५. येथे व्यापारापेक्षा भूराजकीय स्थिती आणि समीकरणे पहाता इराण भारतासाठी एक महत्त्वाचा भूराजकीय भागीदार आहे. पाकिस्तानला शह देण्यासाठी भारत आणि इराण इराणच्या चाबहार बंदराचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भूराजकारणाच्या विषयाकडे दुर्लक्ष केला, तर भारताने इराणशी असलेला व्यापार थांबवला, तरी विशेष काही हानी होणार नाही, परंतु अमेरिकेचा वाढीव आयात शुल्क भारताला मारक ठरू शकतो. तथापि भारत अमेरिकेच्या दादागिरीसमोर मान झुकवणार नाही, हेही खरे आहे. |
संपादकीय भूमिकाट्रम्प यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी जगातील देशांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच चित्र आहे ! |

तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !