अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान !

वॉशिंग्टन (अमेरिका) : ग्रीनलँडला जर अमेरिकेने कह्यात घेतले नाही, तर रशिया किंवा चीन या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी हा भूभाग अमेरिकेच्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. ‘आम्हाला रशिया किंवा चीन आमचा शेजारी म्हणून नको आहे’, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ते ‘व्हाईट हाऊस’मध्ये तेल आणि वायू क्षेत्रांतील कार्यकारी अधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो पुढील आठवड्यात डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री आणि ग्रीनलँडचे प्रतिनिधी यांना भेटणार आहेत.
ट्रम्प यांनी म्हटले की,
खनिजांनी समृद्ध असलेले हे बेट अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच जर राजनैतिक मार्गाने ग्रीनलँड खरेदी करणे शक्य झाले नाही, तर अमेरिकेला कठोर मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो.
ग्रीनलँडचे महत्त्व![]() ग्रीनलँड हा ‘किंग्डम ऑफ डेन्मार्क’मधील स्वायत्त भूभाग आहे. ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा पिटुफिक हा अवकाश तळ आहे. दुर्मिळ खनिजांसह नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला हा देश व्यापाराच्या दृष्टीने मोक्याच्या जागी आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही, म्हणजे वर्ष २०१९ मध्ये ग्रीनलँड विकत घेण्याची कल्पना मांडली होती; मात्र ती पूर्णत्वाला जाऊ शकली नाही. |

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman