
बीजिंग (चीन)- काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय करारांच्या चौकटीत सोडवावा, असे मत चीनने व्यक्त केले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्या सातव्या धोरणात्मक चर्चेनंतर घोषित झालेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आहे; मात्र पाकिस्तानच्या बाजूने चीनने कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
संयुक्त निवेदनात नमूद आहे की, पाकिस्तानने जम्मू-काश्मीर आणि त्यासंबंधित ताज्या घडामोडींविषयी चीनला माहिती दिली. त्यावर चीनने त्याची पूर्वीची भूमिका पुन्हा स्पष्ट केली की, जम्मू-काश्मीरचा वाद हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला विषय आहे.
हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सनदीनुसार, संबंधित सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि द्विपक्षीय करारांच्या आधारे शांततापूर्ण पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. दोन्ही देशांनी समानता आणि परस्पर हिताच्या तत्त्वावर सीमा ओलांडणार्या जलसंपत्तीच्या सहकार्यावरही भर दिला, तसेच आंतरराष्ट्रीय कायदेशीर दायित्वांचे पालन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
सिंधू जल कराराविषयी मौन !
आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षिता यांचे महत्त्व दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले; परंतु भारताने सिंधू जल वाटप करार स्थगित ठेवण्याच्या निर्णयाचा उल्लेख संयुक्त निवेदनात केलेला नाही. पहलगाम येथील आक्रमणानंतर भारताने हा करार स्थगित केला होता. एकूणच चीनने संतुलित भूमिका घेत पाकिस्तानला काश्मीर प्रश्नात द्विपक्षीय मार्गाने समाधान शोधण्याचा सल्ला दिला.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र