
बीजिंग (चीन) – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी चीनने केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारे अन्य देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून स्वतःच्या देशात नेणे चुकीचे आहे. हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला पाहिजे.
🌍🔥 US–Venezuela Tensions Escalate
🇨🇳 China demands the immediate release of President Maduro amid rising global unrest.
🇷🇺 What if Putin arrests Zelenskyy? – asks US Representative Ro Khanna, highlighting dangerous global precedents.
⚖️🚨 “A violation of international & US… https://t.co/ANuGFG4b6G pic.twitter.com/Xxh0S90viw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2026
आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकी कायद्याचे उल्लंघन ! – न्यूयॉर्कचे महापौर ममदानी

न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनीही मादुरो यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला. त्यांनी याला ‘युद्धाची कृती’ म्हटले असून हे पाऊल आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकी कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले.
व्हेनेझुएलातील पालटत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ! – भारत
भारताने व्हेनेझुएलाच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पाठिंबा व्यक्त केला आणि सर्व पक्षांना संवाद अन् शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडवण्याचे आवाहन केले, जेणेकरून तेथे शांतता आणि स्थैर्य राखता येईल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत सरकार व्हेनेझुएलातील पालटत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कराकसमधील भारतीय दूतावास व्हेनेझुएलात रहाणार्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात असून आवश्यकता भासल्यास सर्वतोपरी साहाय्य करील.
Press Release on recent developments in Venezuela ⬇️
🔗 https://t.co/PrU0nIRLiQ pic.twitter.com/jVBI5TcGMV
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 4, 2026
पुतिन यांनी झेलेंस्की यांना अटक केली, तर काय होईल ? – अमेरिकेतील खासदार रो खन्ना

अमेरिकेतील भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार रो खन्ना यांनीही ट्रम्प यांच्या सैनिकी कारवाईवर टीका केली. ‘जर पुतिन यांनी अशाच प्रकारे झेलेंस्की यांना अटक केली, तर काय होईल ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, हे जगासाठी एक धोकादायक उदाहरण ठरू शकते.
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !