‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
(टीप : ‘वोकिझम’ म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !)
१. ‘वोकिझम’ म्हणजे काय ?
‘वोकिझम’ म्हणजे काय ? समजा एका १५ वर्षांच्या मुलाला म्हटले, ‘तू मुलगा नसून मुलगी आहेस.’ नंतर त्याला सांगितले, ‘शल्यकर्म करून तुझी जननेंद्रिये काढून तेथे एक छिद्र निर्माण करणार, जे योनीचे कार्य करील. त्यानंतर तुझे शरीर मुलीचे होऊन जाईल.’ हे ऐकून तोच काय कुणीही आपल्याला वेड्यात काढेल; पण आज आपल्या देशात अशी एक पिढी उभी रहात आहे, जी अशा मूर्खपणावर विश्वास ठेवत आहे. एका मुलाचे जननेंद्रिय पालटल्यावर त्याला मुलगी बनवले जाऊ शकते किंवा एखाद्या मुलीचे जननेंद्रिय पालटून तिला मुलगा बनवले जाते, तर हा मूर्खपणा मान्य करणार्यांना ‘वोक’ म्हटले जाते आणि त्यांच्या चळवळीला ‘वोकिझम’ म्हटले जाते. ही चळवळ जगभरात चालू असून ती संपूर्णपणे अमेरिका, युरोप आणि कॅनडा या देशांमधून आली आहे. आजच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत शिकणार्या मुलांपैकी साधारणतः ४५ टक्के मुलांना हे खरे असल्याचे वाटते. सध्या ही चळवळ आपल्या देशात अल्प असली, तरी ज्याप्रमाणे हिचा प्रचार चालू आहे, त्यावरून ती भविष्यात आपल्या देशातही वाढू शकते.
२. वोकिझम चळवळीचा प्रारंभ कसा झाला ?
एका परिवारात जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी एक लहानसा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्या जननेंद्रियांमध्ये काही समस्या निर्माण झाली. त्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी मुलाच्या पालकांना एक लहानसे शल्यकर्म करण्यास सुचवले. त्यांचे शल्यकर्म करतांना शल्यविशारदाकडून काहीतरी चूक झाली आणि एका बाळाचे जननेंद्रिय कायमस्वरूपी क्षतीग्रस्त झाले. त्यामुळे पालकांनी दुसर्या बाळाचे शल्यकर्म करणे टाळले आणि ते दोन्ही बाळांना घरी घेऊन आले. त्यांनी दूरचित्रवाहिनीवर एक वार्तालाप पाहिला. त्यात गुप्तरोगतज्ञ (सेक्सोलॉजिस्ट) जॉन मनी याने सांगितले, ‘एक बाळ मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर तो मुलीच्या रूपात मोठा होऊ शकतो किंवा एखादी मुलगीही मुलाच्या रूपात मोठी होऊ शकते.’ यात त्या पालकांना आशेचा किरण दिसला. ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी तज्ञावर विश्वास ठेवून लहान बाळाचे शल्यकर्म करून घेतले. हा तो काळ होता, जेव्हा ‘वोकिझम’ चळवळीला नुकताच आरंभ झाला होता. तो मुलगा मोठा होऊ लागल्यावर त्याला पुष्कळ समस्या येऊ लागल्या. आता त्या मुलामध्ये दोन परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी चालू झाल्याने त्याला ते असह्य झाले.

दुसरीकडे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे संपूर्ण जगात ढोल बडवण्यात येऊ लागला. त्यामुळे जॉन मनी हा रातोरात ख्यातनाम व्यक्ती बनला. दूरचित्रवाहिन्यांनी त्याला नायकाच्या रूपात सादर केले. वास्तविक ज्या मुलावर ही शस्त्रक्रिया झाली, तो आता कसा आहे, हे कुणीच पाहिले नाही. ‘तो मुलगा अगदी ठीक आहे आणि तो अत्यंत चांगले जीवन जगत आहे’, असेच सांगितले गेले. यासंदर्भात एका चित्रफितीत त्या मुलाने तो नरकासारखे जीवन जगत असल्याचे स्वत: मान्य केले आणि एक दिवस त्याने आत्महत्या केली; पण अशा कथा बाहेर येत नाहीत. यालाच ‘प्रपोगंडा’ म्हणतात. त्यात जे दाखवायचे असते, तेच समोर आणले जाते; मात्र जे सत्य असून गैरसोयीचे आहे, ते समोर आणण्याचे टाळले जाते.
३. शल्यकर्माची पार्श्वभूमी कशी सिद्ध होते ?

जेव्हा मुले पौंगडावस्थेत (१३-१४ वर्षांची होतात) येतात, तेव्हा त्यांच्या शरिरात संप्रेरकांचा (‘हार्माेन्स’चा) प्रभाव आरंभ होतो. ३० वर्षांपूर्वी माझ्या एका परिचयातील मुलीला मुलाचे कपडे घालण्याची आवड होती. त्याविषयी विचारणा केल्यावर तिला राग यायचा. आज त्या मुलीचा विवाह झाला आहे आणि ती अतिशय चांगले कौटुंबिक जीवन जगत आहे. अशाच प्रकारे एका मुलाला कधी कधी लिपस्टिक लावण्याची आवड होती. तो काही रामलीला करायचा. काही दिवसांनी त्याची आवड नष्ट झाली. ‘वोकिझम’मध्ये काय होते ? अशा मुलांना सांगितले जाते, ‘तुला असे करावेसे वाटत असेल, तर ते योग्य आहे आणि तेच सत्य आहे. त्यामुळे तू तसे वागू शकतो.’ अमेरिका, कॅनडा, युरोप या देशांमध्ये या सर्व गोष्टींना ते ‘जेंडर डिस्फोरिया’ (जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शारीरिक लिंग त्याच्या लिंग ओळखीशी जुळत नाही. त्यामुळे त्याला भावनिक त्रास होऊ शकतो.) म्हणतात. त्याला लिंग परिवर्तन केल्याने चांगले वाटेल, असे सांगितले जाते. ज्यांनी ज्यांनी अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्यांना आता त्याचा पश्चाताप होत आहे. ‘यू ट्यूब’वर अशा शेकडो लोकांचे जीवन नष्ट झाल्याची माहिती मिळेल. हे शल्यकर्म केल्यानंतर त्यात पुन्हा पालट करू शकत नाही.
४. ‘आयुषमान कार्ड’मध्ये लिंगपरिर्वतनाच्या शल्यकर्मासाठी ५ लाख रुपयांचे प्रावधान
भारत सरकारच्या संकेतस्थळावर याच निरर्थक गोष्टीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यावर ‘टॅग लाईन’ (बोधवाक्य) दिसते, ‘व्हेन थिंग्स चेंज्ड इनसाईड यु, थिंग्स चेंज अराऊंड यू.’ (अर्थ : जेव्हा तुमच्यामध्ये काही पालट होतात, तेव्हा तुमच्या सभोवतालच्या गोष्टी पालटतात.) अलीकडे कोणताही अर्ज भरतांना त्यात ‘पुरुष, स्त्री किंवा लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) असे पर्याय दिले असतात. आपल्या समाजात तृतीयपंथी आहेत. त्यांचा आपल्या देशात सन्मान केला जातो. त्यांच्यासाठी अर्जात ‘ट्रान्सजेंडर’ हा पर्याय दिलेला असतो. वास्तविक जो मुलगा लिंगपरिर्वतन करून मुलगी बनला किंवा मुलगी असेल, तर मुलगा बनला, त्याला ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात. या शब्दाचा अर्थ लोकांना ठाऊकच नव्हता; परंतु या शब्दाला स्वीकारार्ह बनवले गेले. आता या अर्जातील ‘ट्रान्सजेंडर’ शब्द काढण्यास सांगितला, तर त्याला तृतीयपंथीविरोधी समजण्यात येईल. ‘आयुषमान भारत योजने’च्या अंतर्गत प्रतिवर्षी पात्र कुटुंबाला विनामूल्य उपचारांसाठी ५ लाख रुपये मिळतात. त्यात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेचाही समावेश करण्यात आला आहे.
५. लिंग पुनर्रचना शल्यकर्म आणि वैद्यकीय साहाय्य मोठे उद्योगक्षेत्र
लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय साहाय्य हा एक पुष्कळ मोठा उद्योग बनला आहे. मुलाची पौगंडावस्था थांबवण्यासाठी महागडी औषधे दिली जातात. सरकार या अयोग्य गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी योजना घेऊन आले आहे. आता वैद्यकीय साहाय्यासह एवढी सर्व संप्रेरके (हार्माेन्स) दिली जातात, जी शरिराची कायमस्वरूपी हानी करतात. भारतातही अमेरिकेची पद्धत स्वीकारण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये मुलगा किंवा मुलगी १२ ते १४ वर्षांचे झाल्यावर त्याच्या इच्छेने शल्यकर्म करून घेऊ शकतात. त्यासाठी शाळेपासून आधुनिक वैद्यांपर्यंत सर्वजण सहकार्य करतात; पण पालकांना विचारण्याचे बंधन नसते. त्यावर आईवडिलांनी आक्षेप घेतला, तर त्यांनाच दोषी ठरवण्यात येते.
भारतात १८ वर्षे वयाच्या व्यक्तीला सज्ञान समजले जाते. १२ ते १८ हे वय अनिश्चित क्षेत्रात (‘ग्रे एरिया’त) येते. १२ वर्षांहून न्यून वय असलेल्या मुलाला लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल, तर तो ते करून घेऊ शकतो. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांनाही प्रोत्साहन देण्यास सांगितले जाते. दुर्भाग्याने भारतात या सर्व गोष्टी वर्ष २०१४ नंतर होत आहेत. या सर्व धोकादायक गोष्टींमध्ये मुसलमान समाज मुळीच फसत नाही. हिंदूंची लोकसंख्या ८० टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. हिंदूंचा प्रजनन दर निरंतर खालावत आहे. अशा प्रकारची मुले झाली, तर ते प्रजनन करूच शकत नाहीत. हे त्यांचे दुसरे उद्दिष्ट आहे.
६. ‘वोकिझम’मुळे भारतीय समाजाचा विनाश
आपल्या हक्काचा पैसा सरकार अशा प्रकारे वाया घालवते, ज्याने हिंदूंची लोकसंख्या आणखी खालावत जाईल. ही गोष्ट संयुक्त राष्ट्रांनी आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ यांच्याशी मिळून केली जात आहे. आपण सरकारला त्यांनी भारताला संयुक्त राष्ट्रांची वसाहत बनवण्यासाठी मत देत नाही. आपण त्यांना केवळ आपली संस्कृती वाचवण्यासाठी निवडून दिले आहे; परंतु ते तर या वैश्विक माफियांशी हातमिळवणी करून आपल्याच समाजाचा सत्यानाश करण्यास निघाले आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये ज्यांनी लिंग पुनर्रचना शल्यकर्म केले, त्यांचे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे. पाश्चात्त्य देशांतील १७-१८ वर्षांच्या मुलींना आता पश्चाताप होत आहे. १९ वर्षाच्या मुलींना आई व्हायचे आहे. निसर्गाने सर्वांत मोठे ‘मातृत्वाचे वरदान’ त्यांना दिले होते; परंतु लिंग परिवर्तनामुळे त्या मुली आता कधीच माता होऊ शकणार नाहीत.’
– श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, पंचकुला, हरियाणा.

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !