ट्रम्प यांना ठराव रहित करण्याचा अधिकार
वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठीचा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ सभागृहामध्ये संमत करण्यात आला. सभागृहात २१५ विरुद्ध २०८ मतांनी हा ठराव संमत झाला, म्हणजे ठरावाच्या बाजूने २१५, तर विरोधात २०८ मते पडली. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या ४ रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्स पक्षाच्या बाजूने, म्हणजे युद्ध थांबवण्याच्या मताच्या बाजूने मतदान केले, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने प्रसारित केले आहे. विशेष म्हणजे हा ठराव रहित करण्याचा अधिकार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प हे नकाराधिकाराचा वापर करून ठराव रहित करू शकतात, असे म्हटले जात आहे.
🇺🇸 US Congress passes a resolution to block war with Iran, directing President Trump to withdraw US forces unless Congress formally authorises military action.
The move signals growing opposition to another Middle East conflict, though Trump still retains the power to veto the… pic.twitter.com/fh6LPH9xeZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2026
१. या ठरावात म्हटले आहे की, संसद युद्ध घोषित करत नाही किंवा सैनिकी बळाच्या वापरास अधिकृत अनुमती देत नाही, तोपर्यंत ट्रम्प यांना इराणमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२. युद्धशक्ती ठराव संमत होणे हा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे. अधिकाधिक रिपब्लिकन नेते मतदारांचे म्हणणे ऐकत असून त्यांना आखाती देशांमध्ये आणखी एक युद्ध नको आहे, असे युद्धशक्ती ठराव मांडणारे प्रतिनिधी ग्रेगरी मीक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !