नोटांना लागली होती वाळवी

कोलकाता (बंगाल) – येथील सुरेंद्रनाथ महाविद्यालयातील तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या कार्यालयातून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. नोटांचा मोठा भाग वाळवी आणि किडे यांमुळे पूर्णपणे नष्ट झाला आहे. बराच काळ बंद असलेले हे कार्यालय प्रशासकीय निर्देशांनुसार उघडले असता हा प्रकार समोर आला.
Large amounts of cash were reportedly found in the Trinamool Congress student union office at Surendranath College in Kolkata – with some currency notes even infested by termites!
The office had remained locked for years after student elections were not conducted and following… pic.twitter.com/F2vIeI8d5h
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
१. विद्यार्थी निवडणुका न झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील हे कार्यालय अनेक वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. अलीकडेच स्वच्छता आणि देखभाल कार्यासाठी अधिकार्यांनी खोलीतील एक कपाट उघडले. कपाटात तृणमूलचे फलक आणि भित्तीपत्रके, तसेच २ ‘ट्रॉली बॅग’ही सापडल्या. जेव्हा त्या उघडल्या गेल्या, तेव्हा त्यात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल भरलेले होते. बराच काळ कपाटात पडून राहिल्यामुळे बहुतांश नोटा वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या.
२. भाजपचे आमदार सजल घोष यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करतांना म्हटले की, या आयुष्यात मला अजून काय पहायचे बाकी आहे ? आम्ही तृणमूल नेत्याच्या घरी पैशांचे डोंगर पाहिले. तृणमूल नेत्याच्या तागाच्या शेतात पैसा पाहिला. आज मी पाहिले की, तृणमूलचे विद्यार्थी नेते कपाटात लाखो रुपये ठेवून आहेत आणि ते पैसेही वाया गेले आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !